उपपदार्थ निर्मिती प्रकल्‍प उभारणा-या कारखान्‍यांना अर्थसहाय्य करू-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा;डॉ.विखे कारखान्‍याच्‍या विस्‍तारीत प्रकल्‍प कामाचा शुभारंभ;अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राच्या मदतीचा शब्द

श्रीरामपूर-सहकारी साखर कारखानदारीला बहुउद्देशीय चेहरा मिळवून देण्‍यासाठी उपपदार्थ निर्मितीला अधिक प्रोत्‍साहन द्यावे लागेल. ऊसाबरोबरच मका आणि तांदुळापासून इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र सरकारने...

श्रीरामपूर-
सहकारी साखर कारखानदारीला बहुउद्देशीय चेहरा मिळवून देण्‍यासाठी उपपदार्थ निर्मितीला अधिक प्रोत्‍साहन द्यावे लागेल. ऊसाबरोबरच मका आणि तांदुळापासून इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र सरकारने धोरण घेतले असून, उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्‍प उभे करणा-या कारखान्‍यांना केंद्र सरकार अर्थसहाय्य करण्‍यास तयार असल्‍याची ग्‍वाही केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली.
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या हस्‍ते करण्यात आले. तत्‍पुर्वी प्रवरानगर येथील डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या विस्‍तारीत प्रकल्‍पाच्‍या कामाचा शुभारंभ झाला.मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झालेल्‍या या कार्यक्रमास उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्‍यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष आ.रविंद्र चव्‍हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्‍यासह जिल्‍ह्यातील महायुतीचे सर्व आमदार आणि सहकार चळवळीतील सर्व कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.आपल्‍या भाषणात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी राज्‍यात झालेल्‍या अतिवृष्टीचा उल्‍लेख करुन शाह म्‍हणाले की, ६० लाख हेक्‍टर क्षेत्रावरील शेती पीकांचे नुकसान झाल्‍याची माहीती आमच्‍याकडे आली आहे. यापुर्वी ३ हजार १३८ कोटी रुपयांची मदत करण्‍यात आली होती. यंदा झालेल्‍या अतिवृष्‍ठीतही मदतीचा प्रस्‍ताव राज्‍य सरकारने आमच्‍याकडे पाठवावा, आम्‍ही मदत करायला तयार आहोत असे आश्‍वासन देवून राज्‍य सरकारने शेतक-यांना या संकटात २ हजार २१५ कोटी रुपयांची मदत आणि ३५ कि.लो धान्‍य देण्‍याचा निर्णय घेतला आहे, कर्जाची वसूलीही थांबविली आहे. मुख्‍यमंत्री आणि दोन्‍हीही उपमुख्‍यमंत्री म्‍हणजे त्रिमुर्ती आहेत, ते बनिया नाहीत तर पक्‍के आहेत. मला आज लोणीत बोलावून शेतक-यांच्‍या मदतीचा शब्‍द घेतला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या हस्‍ते करण्यात आले.

पद्मश्रींच्‍या  कार्याचा गौरव करुन, भारताच्‍या सहकार चळवळीतले ते आद्य पुरुष होते. डॉ.विखे पाटील यांच्‍या सहकार्याने धनंजय गाडगीळ आणि वैकुंठभाई मेहता यांनी सहकार चळवळीचा इति‍हास रचला. एक सहकारी साखर कारखाना निर्माण झाल्‍याने त्‍याचा आदर्श घेवून गुजरात, कर्नाटक आणि उत्‍तर प्रदेशमध्‍येही सहकार चळवळ विस्‍तारली गेली.कारखान्‍यांना उपपदार्थ निर्मितीला चालना द्यावी लागेल असे स्‍पष्‍ट करुन, अमित शाह म्‍हणाले की, ऊसापासून इथेनॉल निर्मिती सुरु करण्‍यात आली. परंतू आता ऊसा बरोबरच तांदुळापासून इथेनॉल निर्मितीचे धोरण केंद्र सरकारने घेतले आहे. एनसीडीसीच्‍या माध्‍यमातून अशा प्रकल्‍पांच्‍या निर्मितीसाठी केंद्र सरकार अर्थसहाय्य करण्‍यास तयार असुन, इथेनॉलवरील जीएसटी कमी करण्‍याचा निर्णयही मोदी सरकारने घेतला असल्‍याची माहीती त्‍यांनी आपल्‍या भाषणात दिली.सहकाराची पंढरी म्‍हणून लोणी प्रवरानगर भागाकडे पाहीले जाते असा गौरवपुर्ण उल्‍लेख करुन, शाह म्‍हणाले की, पद्मश्री विखे पाटील यांनी संपूर्ण जीवन शेतक-यांच्‍या कल्‍याणासाठी व्‍यतीत केले. त्‍यांचाच वारसा पुढे चालवून डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार मजबुत करण्‍याचा यशस्‍वी प्रयत्‍न केला. ग्रामीण विकासाची नवी परंपरा या माध्‍यमातून सुरु केली. सात वेळा या भागातून लोकसभेमध्‍ये निवडून जावून संसदेमध्‍ये  चांगले काम त्‍यांनी केले असल्‍याची आठवण सांगून गुजरात मधील अडचणीत आलेल्‍या बॅकांना संकटातून बाहेर काढण्‍यासाठी त्‍यांची मोठी मदत झाल्‍यामुळेच आज गुजरात मधील २२५ बॅकांना त्‍यांनी जीवदान दिले.मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्‍या भाषणात पद्मश्री आणि पद्मभूषण यांच्‍या पुतळ्याचे अनावरण म्‍हणजे एक प्रकारचे पद्म स्‍मरण असल्‍याचे सांगून सहकार चळवळीची मुहूतमेढ रोवून शेतक-यांमध्‍ये  समाधान निर्माण करण्‍याचे आणि त्‍याला औद्योगिक चेहरा मिळवून देण्‍याचे काम केले आहे. पद्मश्री हे नाडी परिक्षण करायचे त्‍यांनी समाजाची नाडी अचुकपणे ओळखून समाजाचे स्‍वास्‍थ ओळखले. याच विचाराने पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार मोठा केला. पाण्‍याची चळवळ सुरु करुन, दुष्‍काळमुक्‍त महाराष्‍ट्राचे स्‍वप्न दाखविले, त्‍यांचे पुर्णत्‍वास जात असलेले स्‍वप्‍न पुर्ण करण्‍याची जबाबदारी राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍यावर दिली आहे. येणा-या ५ ते ७ वर्षात उल्‍हास खो-यातील ५४ टिएमसी पाणी गोदावरीच्‍या तुटीच्‍या खो-यात वळवून दुष्‍काळाला भुतकाळ बनविण्‍याचे काम आम्‍ही करीत आहोत.
प्रवरा उद्योग समुहाने मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांचा निधी दिल्‍याबद्दल अभिनंदन करुन, मुख्‍यमंत्री म्‍हणाले की, सहकारी साखर कारखान्‍यांनी प्रत्‍येक शेतक-याकडून ५ रुपये द्यावेत असा निर्णय घेतला. परंतू शेतक-यांकडून वसुली करीत असल्‍याचा आरोप झाला. परंतू हे ५ रुपये घेतल्‍यामुळे शेतक-यांच्‍या एफआरपीला कोणताही धक्‍का  लागणार नाही. कारखान्‍यांच्‍या नफ्यातून हे पैसे आम्‍ही घेणार आहोत. काही कारखान्‍यांनी सरकारच्‍या निर्णयाला विरोध केला आहे. परंतू विरोध करणा-या कारखाने कोणते आहेत हे मला माहीती आहे. काटा मारणारे कारखाने मी शोधून ठेवले आहेत असा गर्भित इशारा देवून राज्‍य सरकार शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. या संकटात केंद्र सरकारने आम्‍हाला मदत करावी अशी विनंती आम्‍ही केली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

प्रवरानगर येथील डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या विस्‍तारीत प्रकल्‍पाच्‍या कामाचा शुभारंभ गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला.

उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्‍या भाषणात सहकाराचे जाळे राज्‍यात खोलवर रुजले आहे. यामागे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांची प्रेरणा असून, त्‍यांच्‍या विचारानेच केंद्र आणि राज्‍य सरकारने सहकारातून संमृध्‍दीचा संकल्‍प केला आहे. उपमुख्‍यमंत्री अजीत पवार यांनी आपल्‍या भाषणात पद्मश्रींच्‍या   कार्याचा गौरवपुर्ण उल्‍लेख करुन, सहकार चळवळ सुरु करणा-या पद्मश्रींच्‍या पुतळ्याचे अनावरण देशाचे पहिले सहकार मंत्री असलेल्‍या   शाह साहेबांच्‍या हस्‍ते होणे हा एक अद्भूद योग आहे. ग्रामीण भारताच्‍या   दृष्‍टीने पद्मश्रींचे व्‍यक्तिमत्‍व हे मानबिंदु होते. त्‍यांनी रुजविलेली सहकार चववळ विखे पाटील परिवाराची चौथी पीढी पुढे घेवून जात असल्‍याचे समाधान आहे.कार्यक्रमाचे स्‍वागत व प्रास्‍ताविक जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी करुन, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे सहकाराच्‍या भूमित दुस-यांदा येणे हा आमच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत आनंदाचा क्षण असल्‍याचे सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री शहा यांना चांदीची गदा भेट

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी यशस्‍वी केलेले ऑपरेशन सिंदुर आणि त्‍यानंतर दहशतवाद आणि अर्बन नक्षलवादाच्‍या विरोधात सुरु केलेल्‍या  लढाईला बळ म्‍हणून मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या संकल्‍पनेतून चांदीची गदा भेट देवून त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले. तर मुख्‍यमंत्री, उपमुख्‍यमंत्री आणि अन्‍य मंत्र्यांना राज्‍याच्‍या विकासाचा मंगल कलश आणि ग्रामीण महाराष्‍ट्राचे प्रतिबिंब म्‍हणून बैलगाडीची भेट दिली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!