खोड्या करणाऱ्यांकडे पिढ्यानपिढ्याची सत्ता-मा.आ.मुरकुटे;टाकळीभान येथे अशोक बंधाऱ्याचे जलपूजन

श्रीरामपूर-खोड्या करणाऱ्यांकडे पिढ्यानपिढ्याची सत्ता आहे.ज्या पक्षाचे सरकार आहे, त्याच पक्षाचे ते मंत्री असल्याने त्यांना कुठल्याही अडचणी येत नाहीत,अशी टीका माजी आ.भानुदास...

श्रीरामपूर-
खोड्या करणाऱ्यांकडे पिढ्यानपिढ्याची सत्ता आहे.ज्या पक्षाचे सरकार आहे, त्याच पक्षाचे ते मंत्री असल्याने त्यांना कुठल्याही अडचणी येत नाहीत,अशी टीका माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता केली.परंतु त्यांचा रोख कुणाकडे आहे हे उपस्थितांच्या लक्षात आल्याने एकच खसखस पिकली.तसेच भविष्यात मतदारसंघ खुला होईल.त्यावेळी आम्ही चुकीचे वाटत असलो, तर दुसऱ्या व्यक्तीला निवडून द्या, पण तो आपल्या तालुक्यातीलच निवडून द्या, बाहेरच्याला निवडून देऊ नका,अन्यथा आपल्याला गुलामगिरीत दिवस घालवावे लागतील,असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.यापूर्वी तत्कालीन मंत्री स्व. गोविंदराव आदीक यांच्या माध्यमातूनही अनेक भरीव कामे आपल्या तालुक्यात राबविली गेल्याची आठवण मुरकुटे यांनी यानिमित्ताने काढली.
टाकळीभान येथे अशोक बंधाऱ्याचे जलपूजन नुकतेच त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी मुरकुटे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानदेव साळुंके होते. माजी संचालक एकनाथ लेलकर,  शिवाजी शिंदे, संचालक नीरज मुरकुटे, बाजार समिती संचालक मयूर पटारे, दत्तात्रय नाईक, पुंजाहरी शिंदे, गणेश छल्लारे आदी प्रमुख उपस्थित होते.
मुरकुटे पुढे म्हणाले की,राखीवमुळे जो आमदार निवडून येतो तो प्रभावशाली नसतो.आपल्या हातात कारखाना सोडला तर दुसरी सत्ता नाही. राहुरीचा कारखाना बंद पाडला तसा अशोक कारखाना बंद पाडण्याचा डाव सध्या सत्तेत असणाऱ्यांचा आहे. ही कामधेनू जपण्यासाठी आम्ही जुन्या पिढीतील लोकांनी संघर्ष केला आहे. हीच आपली कामधेनू टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी ‘अशोक’ च्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ‘अशोकला’च उस द्यावा.श्री. मुरकुटे पुढे म्हणाले जलपूजनाचा कार्यक्रम हे फक्त निमित आहे. मात्र, अशोक कारखान्याबद्दल चुकीची माहिती सभासद शेतकऱ्यांमध्ये पोहचवली जात आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना योग्य ती माहिती मिळावी, यानुसार आजची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.त्याचबरोबर अशोक ज्यावेळी आमच्या ताब्यात आला, त्यावेळी या कार्यक्षेत्रात फक्त पस्तीस हजार टन उस होता. अशा परिस्थितीत कारखाना कसा चालवायचा, असा प्रश्न समोर आला होता. काही जणांनी कारखाना बंद करण्याचा सल्लाही त्यावेळी दिला. मात्र, आपण यावर मात करत बाहेरून उस आणून हा कारखाना चालविला. त्याचबरोबर मी १९८० साली आमदार झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून गोदावरी,प्रवरा नदीबर कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांची मालिका उभारून पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम युद्धपातळीवर राबविली. आपण आपल्या भागात ओढे-नाले तसेच जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे बंधारे व तळे बांधले. व त्याचाच परिपाक म्हणून या दोन्ही नद्यांचे कार्यक्षेत्र ऊसाचे आगार म्हणून ओळखले जाऊ लागले. अशोक पेक्षा दुसरे कारखाने भाव जास्त देत आहेत. म्हणून बाहेर ऊस दिला गेला. परंतु आपल्या शेजारील मुळा, ज्ञानेश्वर यांचे गाळप आपल्यापेक्षा जास्त असूनही त्यांचा भाव आपल्या बरोबरीने म्हणजेच २७०० रुपये आहे. काही कारखान्यांना दारू निर्मितीची जोड असल्याने ते जास्त भाव देतात. आपल्या कारखान्याचे गाळप साडेचार लाख टन झाले आहे. गाळप कमी झाल्यास हा कारखाना चालणार नाही.यावेळी माजी उपसरपंच पाराजी पटारे, भाऊसाहेब पटारे, संजय पटारे, लक्ष्मण सटाले, भागवत रणनवरे, संजय रणनवरे, शिवाजी पटारे, दत्तात्रय पटारे, रावसाहेब वाघुले, मच्छिंद्र कोकणे, भास्कर कोकणे, दत्तात्रय बोडखे, सुनिल बोडखे, सुनिल त्रिभूवन, जालींदर वेताळ, अमोल पटारे, नानासाहेब लेलकर, अमोल कोकणे, ज्ञानेश्वर शिंदे, विजय कोकणे, उत्तम पवार, शिवाजी नवले आदी सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.

टाकळीभान येथील जलपूजन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा. आ. भानुदास मुरकुटे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!