अवकाळी व गारपीटग्रस्त नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- आ.ओगले

श्रीरामपूर-श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामध्ये प्रामुख्याने गहु, कांदा, मका, द्राक्ष...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामध्ये प्रामुख्याने गहु, कांदा, मका, द्राक्ष टरबुज यांसारख्या या पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिल्या असल्याचे आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, राधाकिसन बोरकर, अनिल ढोकचवळे, विजय ढोकचवळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.गारपीट व अवकाळी मुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता तोंडाशी आलेल्या पिकांना अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करा असे आदेश आमदार ओगले यांनी प्रशासनाला दिले आहे.एकीकडे शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, खतांचे वाढलेले दर, फसवी कर्जफामी यासारख्या अनेक संकटांना शेतकरी सामोरे जात असताना त्यातच अवकाळी आणि गारपीट यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्यामध्ये देखील अवकाळी मुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी करणार असल्याचे आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

श्रीरामपूर पोलीसांकडून 27 मोबाईल मूळ मालकांना परत

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणाहून गहाळ झालेले किंवा चोरी झालेले २७ मोबाईल शहर पोलीस ठाण्याकडून त्यांच्या मूळ मालकांना डीवायएसपी जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या हस्ते

Latest News

Trending News

error: Content is protected !!