श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील ब्राह्मणगाव वेताळ येथे सरकारी व गायरान जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी सरपंच मनीषा समाधान शिंदे व सदस्य वर्षा अमोल म्हस्के यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले होते.या निर्णयाविरोधात त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. मात्र, आयुक्त अजय मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत दोघांची अपात्रता कायम ठेवली.या प्रकरणी
ब्राह्मणगाव वेताळचे माजी सरपंच राधाकृष्ण आहेर यांनी तक्रार दाखल केली होती.त्यावर सुनावणी होऊन सदर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान या निर्णयामुळे तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे.
सरपंच शिंदे यांच्या पतीने रमाई आवास योजनेतील घरकुलाव्यतिरिक्त सरकारी जागेवर बेकायदेशीर बांधकाम केल्याचे आढळले, तर सदस्य म्हस्के यांच्या पतीने गायरान जमिनीवर नियमबाह्य व्यवसाय सुरू केला होता,असे सदरच्या तक्रारीत म्हटलेले होते. त्यावर चौकशी होऊन सुनावणी नंतर आयुक्तांनी निर्णय करत दोघांवरही अपात्रतेची कारवाई केली आहे.
