माऊली प्रतिष्ठानने शिक्षणासोबत सामाजिक दायित्व जपले-आ.ओगले;कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळा

श्रीरामपूर-शिक्षणासोबतच समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून माऊली प्रतिष्ठानने आपले सामाजिक दायित्व प्रभावीपणे जपले असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले.माऊली...

श्रीरामपूर-
शिक्षणासोबतच समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून माऊली प्रतिष्ठानने आपले सामाजिक दायित्व प्रभावीपणे जपले असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले.
माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर मुरकुटे व डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली वांगी–भेर्डापूर येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व कृतज्ञता पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भानुदास मुरकुटे होते.यावेळी नूतन नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसध्यक्ष सचिन गुजर, उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, अच्युत बडाख, बाबुराव बडाख, शांताराम तूवर, भरत साळुंके, विराज भोसले, नितीन भागडे, अर्जुन राऊत, योगेश उंडे, ताजखा पठाण, अरुण कवडे, बाबासाहेब तागड, सौ. भावना शिनगारे, नयन गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुढील मान्यवरांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.युवा भूषण पुरस्कार ॲड. शुभम फरगडे (मोडी लिपी तज्ज्ञ) ,जीवनगौरव पुरस्कार चंदर बापू दासरजोगी (पाटील, वैदू समाज – निपाणी) ,प्रगतशील शेतकरी म्हणून बापूसाहेब उंडे (मातापुर), सामाजिक कार्यासाठी सौ. हरणाबाई गो. चव्हाण (वारकरी – कारेगाव), अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सौ. भगीरथीबाई की. गायधने (निपाणी वडगाव) तसेच समाजभूषण पुरस्काराने बाळासाहेब गायकवाड (वडाळा महादेव) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावर्षीचे उत्कृष्ट विद्यार्थी व पालक यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आ. हेमंत ओगले* म्हणाले की, आपल्या कार्यातून समाजासाठी आदर्श निर्माण करणाऱ्या या सर्व व्यक्ती प्रेरणादायी असून सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल.कार्यक्रमास संजय कवडे, योगेश बडधे, पवन पाऊलबुधे, जालिंदर दाणे, सुनील भराडी, प्रकाश जाधव, शामसुंदर बडाख , गोरख तारडे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!