जोरदार पावसाने खरीप पिकांचे नुकसान;सरसकट पीकविमा देण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

श्रीरामपूर-गेल्या दोन तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने काढणीला आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान केले आहे. काल दि.15 रोजी सायंकाळ नंतर...

श्रीरामपूर-
गेल्या दोन तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने काढणीला आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान केले आहे. काल दि.15 रोजी सायंकाळ नंतर जोरदार पाऊस सुरु झाला.तो रात्री साडेनऊपर्यंत चांगलाच बरसला.त्यांनंतर रात्रभर पावसाची संततधार सुरू होती.आज दि.16 रोजीही दुपारनंतर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये दोन-अडीच तास कोसळलेल्या पावसामुळे शेत शिवारात पाणीच पाणी झाले. श्रीरामपूर शहरातही अनेक सखल पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सखल भागात पाणी साचले होते. शहरातील गटारे तुडुंब भरून वाहू लागली.अनेक भागात नागरिकांची मोठी तारांबळ झाली.नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मध्यरात्रीपर्यंत पथके तयार करून जमा झालेले पाणी वाहते राहील यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.दरम्यान कालच्या ग्रामीण भागात सोंगणीस आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच अनेक भागात लवकर लागवड झालेल्या कापसाची वेचणी सुरू झाली होती. तो कापूसही या पावसाने भिजला असुन वाढलेल्या ऊस पिकाचे देखील पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी ऊस भुईसपाट झाला आहे. त्याला पाऊस उघडल्यावर उंदरे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. सोयाबीन पिकांवर पाणी साचल्याने कुज येण्याची भीती आहे. कापसाला डाग पडले असून, अनेक ठिकाणी उभा ऊस भुईसपाट झाला आहे.जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे मोठया प्रमाणावर खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात सरसकट पीकविमा मिळावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

सोंगणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे जोरदार पावसाने झालेले नुकसान.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!