आयुष्यात पुन्हा नव्याने उभे राहण्याची प्रेरणा खेळातूनच-माजी आ.मुरकुटे

श्रीरामपूर-सांघिक खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकोपा वाढतो तसेच सर्व जात, धर्म, पंथ, व भाषा विसरून सर्वजण खेळ या एकाच भाषेद्वारे एकत्र येतात. पराभूत...

श्रीरामपूर-
सांघिक खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकोपा वाढतो तसेच सर्व जात, धर्म, पंथ, व भाषा विसरून सर्वजण खेळ या एकाच भाषेद्वारे एकत्र येतात. पराभूत झाल्यानंतर आयुष्यात पुन्हा उभे राहण्याची व नव्या उत्साहाने आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा ही खेळाद्वारे मिळते, असे प्रतिपादन अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.अशोक सहकारी साखर कारखाना संचलित माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली व सौ.मंजुश्री मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अशोक आयडियल या सीबीएसई संलग्न स्कूलमध्ये तालुकास्तरीय आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. सदर स्पर्धा ही श्रीरामपूर तालुका क्रीडा संघटना व अशोक आयडियल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. यावेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणात भानुदास मुरकुटे बोलत होते.अशोक आयडियल स्कूल मध्ये विविध खेळाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविला जातो असे यावेळी अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी नमूद केले. श्रीरामपूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब चौधरी तसेच उपाध्यक्ष नितीन तमनर यांनी स्पर्धेकरिता उपलब्ध सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये वय वर्षे १४, १७ व १९ खालील वयोगटांमध्ये मुले व मुली यांचे प्रत्येकी ३२ संघ सहभागी होते.
पाहुण्यांचा सत्कार प्राचार्य रईस शेख यांनी केला याप्रसंगी अशोक सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासाहेब आदिक, सौ.मंजुश्री मुरकुटे, अशोक कारखान्याचे संचालक निरज मुरकुटे, रामभाऊ कसार,  ॲड्.सुभाष चौधरी, अशोक पॉलिटेक्निकचे प्राचार्य अंजाबापू शिंदे तसेच इतरही अनेक क्रीडा शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी काळे व अनुष्का कुंदे यांनी केले तर आभार तनिषा बारसे हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक राजू दुधाने सुनील बागुल युसुफ सय्यद यांनी परिश्रम घेतले.

अशोक आयडियल स्कूलमध्ये तालुकास्तरीय आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मा.आ.भानुदास मुरकुटे यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!