श्रीरामपूर-नितीन शेळके
योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहास आज मठाधिपती गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या मिरवणुकीने व शोभायात्रेने उत्साहात प्रारंभ झाला.टाळ-मृदुंगाच्या गजरात, जयघोषात आणि विविध रंगीबेरंगी चित्ररथांच्या साथीत ही मिरवणूक सप्ताहस्थळी पोहोचली.या सप्ताहाने पहिल्याच दिवशी गर्दीचा विक्रम केला.आज सुमारे 2-2.5 लाखांहून अधिक भाविक हरिनामात तल्लीन होऊन सप्ताहात सहभागी झाल्याचा आयोजकांचा दावा आहे.गोदावरी नदीच्या काठावर भक्तीमय व नयनरम्य वातावरणात लाखो भाविकांनी पगंतीत मांडे पुरणपोळी महाप्रसादाचा आनंद घेतला. येवला, नांदगाव तालुक्यासह संगमनेर, राहुरी,श्रीरामपूर,नेवासा , गंगापूर, वैजापूर आदी तालुक्यातील ६२ गावांनी पुरणपोळी,व मांडे तर लक्ष्मीमाता मिल्कचे बाबासाहेब चिडे व मित्रमंडळाच्यावतीने १५ हजार लीटर दुध असा महाप्रसाद पुरवठा केला. या पहिल्या दिवसाचे सप्ताह स़ोहळयास अविनाश पाटील गलांडे, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, नागेबाबा परिवाराचे प्रवर्तक कडुभाऊ काळे, कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे,माजी सभापती वंदनाताई मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे,अश़ोकचे संचालक निरज मुरकुटे, डॉ प्रकाश शेळके, अशोक बोऱ्हाडे, सतीष आसने,राधाकृष्ण बोरकर, ज्ञानेश्वर सोडणार,पंकज ठोंबरे,प्रवीण पवार, पवन चव्हाण, गणेश तांबे,बद्रीआण्णा चव्हाण,सतीष शिंदे, भिमाशंकर तांबे, तात्यासाहेब नवले,भारत पवार, योगेश पवार, संत बहिरा जातवेद संस्थानचे विश्वनाथगिरी महाराज,बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज,किशोर थोरात , दत्तात्रय खपके, चंद्रकांत महाराज सावंत, रामभाऊ महाराज नादीकर, बाळासाहेब महाराज रंजाळे, ज्ञानेश्वर महाराज गुंजाळ, संदिप महाराज बनसोडे भगवान महाराज शास्त्री, नवनाथ महाराज आंधळे आदि उपस्थित होते. या सोहळ्यास विरगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा अधिकारी व ३१० पोलीस कर्मचारी सप्ताहास तैनात करण्यात आले आहे.एस डी आर एफ जवान दोन प्रमुख अधिकारी व चाळीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहे.सप्ताहाच्या इतिहासात प्रथमच प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
