विखे पाटलांनी संयमाने हाताळले आंदोलन;मराठा आंदोलकांनीही विखे यांच्यावर मुक्तहस्ते उधळला गुलाल

श्रीरामपूर-नितीन शेळकेमहाराष्ट्राच्या राजकाराणातील एक अत्यंत प्रभावशाली मराठा चेहरा म्हणून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव अधोरेखित...

श्रीरामपूर-नितीन शेळके
महाराष्ट्राच्या राजकाराणातील एक अत्यंत प्रभावशाली मराठा चेहरा म्हणून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव अधोरेखित झाले आहे.त्यांच्या निमित्ताने हा मान अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाल्याने जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन त्यासाठी मोठे निमित्त ठरले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत अवघ्या काही दिवसात त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेली जबाबदारी त्यांनी यशस्वी करून दाखवित मराठा समाजाचीही मने जिंकली आहेत.आज मराठा आंदोलकांनी विखे पाटील यांचे मुंबई येथे आभार मानत त्यांच्यावर गुलालाची मुक्त हस्ते उधळण केली.

विखे पाटील यांनी सातत्याने अतिशय संयमाने सर्वाशी संवाद साधत 3 ते 4 दिवस घेतलेल्या मेहनतीचे यश जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी करण्यात झाले आहे.या निमित्ताने मुंबई मध्ये गणेश उत्सवात निर्माण झालेल्या पेच प्रसंगातुन त्यांनी सरकारलाही लीलया बाहेर काढले आणि मराठा समाजालाही न्याय मिळवून देत आंदोलकांचे समाधान केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसमितीच्या अध्यक्षपदी मंत्री विखे पाटील यांची नियुक्ती केली होती.समितीच्या सर्व सदस्यांना एकत्रित करून त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रत्येक मागणीवर कायदेशीर दृष्टीने अभ्यास करून त्याला कायदेशीर आधार देण्यासाठी त्यांनी बैठकांचा सिलसिला सलग सुरू ठेवला.परिस्थिती जिकरीची आणि संवेदनशील होती तरी त्यांनी त्रागा न करता आंदोलकांशी अतिशय उत्तम समन्वय ठेवला. आधिकारी वर्गाच्या बैठका घेऊन आंदोलकांच्या मागण्यांवर समाधान शोधण्याची तारेवरची कसरत त्यांना करावी लागली.मंत्री विखे पाटील यांच्यातील नेतृत्व गुणांची मराठा आंदोलनाच्या निमिताने पुन्हा एकदा राज्याला प्रचिती आली.त्यामुळेच मनोज जरांगे यांनीही आजच्या मराठा आंदोलनाच्या यशस्वी होण्याचे श्रेय निर्विवादपणे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्व आंदोलकांसमक्ष दिले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!