श्रीरामपूरात गावठी कट्टे विकण्यासाठी आलेले तीन आरोपी गजाआड;५ गावठी कट्टयांसह ४ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर-श्रीरामपूर रेल्वे उड्डाणपूलाजवळ हरेगाव फाटा येथेस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तीन आरोपींना जेरबंद केले आहे.हे तिघेही गावठी कट्टे विक्रीसाठी आले...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर रेल्वे उड्डाणपूलाजवळ हरेगाव फाटा येथे
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तीन आरोपींना जेरबंद केले आहे.हे तिघेही गावठी कट्टे विक्रीसाठी आले होते अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.त्यांच्या कडून पाच गावठी कट्टे, नऊ काडतुसे व पल्सर मोटारसायकल असा ४ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकून तीन संशयितांना पकडले. अक्षय उर्फ भावड्या संजय माळी, (वय 23 वर्षे, रा. फत्तेपुर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) अजय शिवाजी मगर, (वय 25 वर्षे, रा. नांदुर शिखरी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) योगेश मच्छिंद्र निकम, ( वय 35 वर्षे, रा. वडगांवगुप्ता, ता. नगर, जि. अहिल्यानगर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींकडून  एकूण ५ गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) ९ जिवंत काडतुसे, पल्सर मोटारसायकल क्र. एमएच 17 डीजी 5767 असा एकूण ४,०९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.प्राथमिक चौकशीत आरोपींकडील शस्त्रे विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा 1959 कलम 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पोहे.कॉ. पंकज व्यवहारे, पोहे. कॉ. अतुल लोटके, पोहे. कॉ. उमेश खेडकर, पोहे. कॉ. दिगंबर कारखेले व पोहेकॉ. मल्लिकार्जुन बनकर, पोहे. काँ. दिपक घाटकर, पोहे. काँ. फुरकान शेख, पोकाँ प्रशांत राठोड यांच्या पथकाने पार पाडली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तीन आरोपींना जेरबंद केले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!