कापूस उत्पादकांना क्विंटलला ४ हजारांचा फटका?आयात शुल्कमाफीच्या निर्णयाने शेतकऱ्यांत संताप

श्रीरामपूर-केंद्र सरकारने कापूस आयातीवर असलेले ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्याच्या निर्णयाने कापूस उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे...

श्रीरामपूर-
केंद्र सरकारने कापूस आयातीवर असलेले ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्याच्या निर्णयाने कापूस उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीन ते चार हजार रुपये कमी भाव मिळेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला जात आहे.कांदा उत्पादक शेतकरी यंदा कमी भाव मिळाल्याने अगोदरच आर्थिक संकटात असताना आता कापसाच्या या तुघलकी निर्णयामुळे शेतकरी पुरता भरडला जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या अध्यादेशाची ठिकठिकाणी होळी करून निषेध केला जात आहे.अखिल भारतीय किसान सभा व संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने दि. १, २, ३ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (दि.२) शेवगाव येथील क्रांती चौक येथे आंदोलन करत त्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.
शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा असून तो निषेधार्ह आहे, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे यांनी या प्रसंगी केली.केंद्र सरकारने कापसावर ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्यामुळे भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. एकीकडे अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला आहे; दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने अमेरिकन कापूस आयातीवरील ११ टक्के करमाफी केली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल कमी भावात कापूस विकावा लागणार असून शेतकरी आर्थिक संकटात येतील. केंद्र सरकारने हा अध्यादेश तातडीने मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, कॉ. संदीप इथापे, कॉ. भगवानराव गायकवाड, कॉ. बापूराव राशिनकर, कॉ. बबनराव पवार, कॉ. दत्तात्रय आरे, कॉ. रामभाऊ लांडे, कॉ. विष्णू गोरे, कॉ. भिवा घोरपडे, कॉ. बाबूलाल सय्यद, कॉ. विठ्ठल उगले आदी आणि कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!