‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१...

श्रीरामपूर-
आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘कोंबींग-ऑपरेशन ऑलआउट’ राबविण्यात आले.त्याद्वारे अवैध धंदे व आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन ऑलआउट’ राबविण्यात आले.त्यामध्ये एकूण 431 समन्सची बजावणी करण्यात आलेली आहे.एकूण 131  बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे. एकूण 107 नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे. ह्या व्यक्तींना विविध न्यायालयांनी अटक वॉरंट जारी  केले होते. त्यांना अटक करून आज रोजी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.दारूबंदी कायद्या खाली संपूर्ण हद्दीमध्ये विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा  कलम 65 (ई) प्रमाणे 28 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले व अवैध दारू जप्त करण्यात आली. तसेच दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या  10 व्यक्तींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम कलम 85(1) प्रमाणे 10 गुन्हे दाखल करण्यात आले. महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदाखाली विविध ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांवर छापे टाकण्यात आले.

महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) नुसार त्या सर्वांवर 13 गुन्हे दाखल करण्यात आले.रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 5 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच रात्रीच्या वेळी संशयास्पद मालमत्ता ताब्यात मिळून आलेल्या 5 व्यक्तीदेखील मिळून आल्या. त्या पाचही व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस कलम 124 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडील संशयित मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 11 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. विविध पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा करून फरार असणाऱ्या आरोपींची शोध मोहीम राबविण्यात आली. त्यापैकी 3 आरोपी मिळून आल्याने  त्यांना अटक करण्यात आलेली आहे.अवैधरित्या हत्यार बाळगणारे आरोपींवर कारवाई करून हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मोटार वाहन कायद्यान्वये एकूण 80 केसेस करून 65900/- रू. दंड वसूल करण्यात आलेला आहे. श्रीरामपूर विभागातील सर्व तडीपार आरोपींची चौकशी करण्यात आली. त्यापैकी नेवासा पो.स्टे. हद्दीत 1 आरोपी मिळून आल्याने त्याचेविरूद्ध म.पो.का.क. 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संगमनेर तालुका पोस्टे. हद्दीतील शिक्षा पात्र वॉरंट स्पेशल केस नं. 18/2009 मधील आरोपी आनंदा किसन चौधरी वय – 42 वर्षे रा. शिरसगाव धुपे ता. संगमनेर यांस  मा. सत्र न्यायालयाने 3 वर्षे शिक्षा सुनावली होती. त्यास ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.सदर ऑपरेशन सुनिल पाटील, उ.वि.पो.अधीकारी शेवगाव, बसवराज शिवपूजे, उप.वि.पो.अधीकारी श्रीरामपूर, शिरीष वमने, उप.वि.पो.अधीकारी, शिर्डी व कुणाल सोनवणे, उप.वि.पो.अधीकारी, संगमनेर उपविभाग यांच्या देखरेखीखाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी राबविले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!