श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात बनावट दारूची निर्मिती होत असल्याबाबतची गुप्त माहिती श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून अपर पोलीस अधीक्षक कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करून सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे बनावट दारू तयार करत असल्याचे उघड झाले. श्रीरामपूर अपर पोलीस कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज श्रीरामपूर शहरात ही कारवाई करत सुमारे ४०० लीटरचे स्पिरीट संबंधित आरोपीकडून जप्त केले आहे. श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना श्रीरामपुरात बनावट दारू बनवली जाते अशी गुप्त माहिती मिळाली होती.त्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत आज हा छापा टाकून ४०० लीटर स्पिरीटसह बनावट दारू बनवलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.याबाबत दुपारी उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
