श्रीरामपूर –
अखिल भारतीय हिंदू धर्म परिषदेच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘धर्म रक्षक पुरस्कार’ या वर्षी
शिवसेनेचे नेते,राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे हरियाणा येथील महान तपस्वी महायोगी श्री श्री 1008 महामंडलेश्वर कालिदास बाबा यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.अखिल भारतीय हिंदू धर्म परिषद ही सनातन धर्म प्रचार व प्रसार करणारी देशातील सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेच्या वतीने हिंदू धर्माचे काम करणारे व्यक्तींना प्रत्येक वर्षी हा मानाचा हिंदू धर्म रक्षक प्रदान केला जातो.यावर्षीचा हा पुरस्कार कट्टर हिंदुत्वादी नेते म्हणून ओळख असलेले सागर बेग यांना प्रदान करण्यात आला आहे.

शिवसेनेचे नेते,राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना महान तपस्वी महायोगी श्री श्री 1008 महामंडलेश्वर कालिदास बाबा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना सागर बेग म्हणाले की,हा पुरस्कार मला महामंडलेश्वर कालिदास बाबा यांच्या हातून मिळाला.त्यामुळे माझी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या कामाची जबाबदारी अजून वाढली आहे.तसेच हा पुरस्कार म्हणजे माझ्या आजवर केलेल्या कामाची पावती आहे,असे मी मानतो.आजवर मी हे काम जितक्या वेगात करत होतो, त्यापेक्षा दुप्पटवेगाने आता मी हे काम करणार आहे.महाराज माझी आपल्याला विनंती आहे की,नुकताच 2006 च्या मुंबई रेल्वे बॉम्ब स्फोटाच्या बाबतीत न्यायालयाने सर्व जिहादी आरोपींची सुटका करण्याचा जो दुर्दैवी निर्णय दिला, त्याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करावी. सुटका झालेल्या 12 आरोपींपैकी 5 जणांना सत्र न्यायालयाने फाशीची तर इतर 7 आरोपींना आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.परंतु उच्च न्यायालयाने मात्र त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहे.ही देशासाठी दुर्भाग्यची गोष्ट आहे.आपल्याकडे हिंदू संघटनानांच्या वतीने ही बाब पंतप्रधान यांच्या कानावर घालन्याची विनंती आम्ही करत आहोत. यावेळी भाजपाचे जिल्हा सचिव दत्ता खेमनर यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.