कोंबिंग ऑपरेशन राबवून चार आरोपी गजाआड;श्रीरामपूर शहर पोलिसांची दमदार कारवाई

श्रीरामपूर:
वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांना हवे असलेले वॉरंटमधील चार आरोपी श्रीरामपूर शहर पोलिसांनी आज पहाटे ताब्यात घेतले आहेत.श्रीरामपूर शहर पोलिसांनी दमदार कारवाई करून कोंबिंग ऑपरेशन राबवून एन बी डब्ल्यू वॉरंटमधील या चौघांना आज दिनांक ७ जुलै 2025 रोजी बेलापूर दुरुक्षेत्र येथे पहाटे साडेपाच ते साडेसात वाजेच्या दरम्यान ताब्यात घेण्यात आले.या कारवाईत एन बी डब्ल्यू वॉरंट मधील सुरज मायकल रनवरे,मयूर प्रकाश खरात,विजय अशोक पवार, सागर गोकुळ बर्डे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भर पहाटेच केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमुळे श्रीरामपुर तालुक्यातील फरार असलेल्या आरोपींचे आता धाबे दणाणले आहेत.
सदर कोम्बिंग ऑपरेशन पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस हवालदार श्री.लोढे, पोलीस अंमलदार अमोल गायकवाड, सचिन काकडे, नंदू लोखंडे, भरत तमनर, महिला पोलीस नाईक गलांडे  यांनी राबवले.सदर कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे ,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केली.

श्रीरामपूर शहर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून वॉरंटमधील चौघांना ताब्यात घेतले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News