श्रीरामपूर:
रयत शिक्षण संस्थेच्या टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची आषाढी एकादशी निमित्ताने वृक्षदिंडी उत्साहात पार पडली.वृक्षदिंडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी टाळ मृदुंगाच्या तालावर विविध भजने व गवळणी म्हणत टाकळीभान परिसरात भक्तिमय वातावरण तयार केले . यावेळी विद्यार्थांनी वारकऱ्यांच्या अतिशय सुंदर वेशभूषा तयार केल्या होत्या.या वृक्षदिंडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला .टाकळीभान मधील पालक, ग्रामस्थ व विद्यालयाच्या हितचिंतकांनी वृक्षदिंडीचे ठिकठिकाणी स्वागत केले .
ही वृक्षदिंडी पार पाडण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर . एम . शिंदे, पर्यवेक्षक श्री .एस .एस .जरे, विद्यालयाचे उपशिक्षक श्री.ए .ए .पाचपिंड, श्री.एस.जी . काळे, श्री.एस.पी . पटारे,श्री . बी .व्ही . देवरे ,श्रीमती एन .ए . पालवे, श्रीमती यु . डी. सुतार आदींनी परिश्रम घेतले .
