केमिकलपासून दुध बनवताना तीन जण पकडले;17 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर-जामखेड तालुक्यातील दूध संकलन केंद्रावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुध तयार करण्यासाठी वापरले जाणारे 1198 लिटर पॅराफिनऑइल नावाचे केमीकल...

श्रीरामपूर-
जामखेड तालुक्यातील दूध संकलन केंद्रावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुध तयार करण्यासाठी वापरले जाणारे 1198 लिटर पॅराफिनऑइल नावाचे केमीकल व दुध पावडर मिळुन आले.पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून 17,32,816/- रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीत दोन जण राहुरी तालुक्यातील आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,पोलीस अधीक्षक,सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला  जिल्ह्यामध्ये दुध भेसळ करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  दि.14/02/2026 रोजी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत दुध भेसळ करणारे इसमांची माहिती काढत असताना रामदास नवनाथ उबाळे, रा.फक्राबाद ता.जामखेड हा त्याचे दुध संकलन केंद्रामध्ये केमीकल पासुन दुध तयार करुन ते संकलन झालेल्या दुधामध्ये मिक्स करत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर राजेश नामदेव बडे, अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह रामदास उबाळे याच्या दुध संकलन केंद्रावर छापा टाकला. सदर ठिकाणी  समीर कमरुद्दीन शेख वय- 30 वर्षे रा. उंबरे ता.राहुरी जि. अहिल्यानगर,आफताब कलीम शेख वय- 28 वर्षे रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी ता. राहुरी जि. अहिल्यानगर, रामदास नवनाथ उबाळे वय- 46 वर्षे रा. फक्राबाद ता.जामखेड हे मिळुन आले. त्यानंतर पथकाने दुध संकलन केंद्राची ठिकाणची पाहणी केली असता सदर ठिकाणी दुध तयार करण्यासाठी वापरले जाणारे 6 ड्रममध्ये 1198 लिटर Paraffin oil नावाचे केमीकल व दुध पावडर मिळुन आले. या केमीकल बाबत ताब्यातील इसमांकडे विचारपुस करता त्यांनी सदरच्या केमीकल पासुन दुध तयार करण्यात येत असुन, 6 ड्रममधील केमीकल पासुन 24,000 लिटर दुध तयार होत असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांच्या कब्जातुन दुध तयार करण्यासाठी वापरले जाणारे 2,39,600/- रु. कि.चे 1198 लिटर Paraffin Oil, 81,056/- रु कि.ची प्लास्टिक बॅगमध्ये पांढ-या रंगाची 300 किलोग्रॅम पावडर, 12,160/- रु कि.चे 320 लिटर केमीकल पासुन तयार केलेले दुध, 14,00,000/- रु  कि.चे दोन पिकअप वाहन असा एकुण 17,32,816/- रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
     ताब्यातील आरोपींविरुद्ध  जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 84/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 274, 275, 123, 3(5) सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26(1), 26(2)(i) शिक्षा कलम 57, 59 प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर हे करीत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!