सीएने केली अडीच कोटींची फसवणूक;दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपूर-कन्स्ट्रक्शन्स कंपनीची जीएसटी व इन्कम टॅक्स भरण्यासाठी दिलेली रक्कम भरणा न करता अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार्टड अकाऊटंट असलेल्या दोघा...

श्रीरामपूर-
कन्स्ट्रक्शन्स कंपनीची जीएसटी व इन्कम टॅक्स भरण्यासाठी दिलेली रक्कम भरणा न करता अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार्टड अकाऊटंट असलेल्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कैलास भाऊसाहेब कराळे (रा. गोविंदनगर, नाशिक) यांच्याकडून आरोपी ललित ज्ञानेश्वर कदम व शशांक ज्ञानेश्वर कदम यांनी धनंजय कन्स्ट्रक्शन्सच्या जीएसटी व इन्कम टॅक्स भरण्याकरिता वेळोवेळी 2 कोटी 25 लाख 37 हजार 816 रुपये स्वीकारले. त्यापैकी 1 कोटी 24 लाख 46 हजार 35 रुपयांची रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरली. आजतागायत ही रक्कम व त्यावरील व्याज व दंड मिळून एकूण 2 कोटी 42 लाख 60 हजार 535 रुपये असे जीएसटी विभाग व इन्कम टॅक्स विभागात न भरता दोघा भावांनी संगनमत करून फिर्यादी कैलास कराळे यांची फसवणूक केली.हा प्रकार सन 2019 पासून ते दि. 11 फेब्रुवारी 2026 या कालावधीत धनंजय कन्स्ट्रक्शन्सच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या गोविंदनगर शाखेत घडला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोघा भावंडांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.फिर्यादी कैलास कराळे यांच्या वतीने ऍड.वरूण आदिक हे काम पाहत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!