ममदापूर सोसायटीवर शासकीय लेखापरीक्षक नियुक्त करा-जवरे

श्रीरामपूर-ममदापूर सहकारी सोसायटीच्या मागील संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे संस्थेचे 4 ते 5 वर्षाचे लेखापरीक्षण न झाल्यामुळे संस्थेचा कारभार ठप्प झाला आहे....

श्रीरामपूर-
ममदापूर सहकारी सोसायटीच्या मागील संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे संस्थेचे 4 ते 5 वर्षाचे लेखापरीक्षण न झाल्यामुळे संस्थेचा कारभार ठप्प  झाला आहे. त्यामुळे शासनाने सध्या नियुक्त केलेल्या सर्व लेखापरीक्षकांची नियुक्ती रद्द करून त्या ठिकाणी शासकीय लेखापरीक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे यांनी सहाय्यक निबंधक, राहता यांच्याकडे तक्रार अर्जद्वारे केली आहे.
तसेच सन 2020-2021 या काळात संस्थेच्या संचालकांनी लेखापरीक्षक नियुक्त करण्याचा ठराव करून लेखापरीक्षकाची फी अदा केल्याचा ठरावही केला होता.परंतु सदर त्या लेखापरीक्षकांनी केलेला लेखापरीक्षण अहवाल संस्था, बँक, सहाय्यक निबंधक, जिल्हा लेखापरीक्षक या कोणाकडेही उपलब्ध झालेला नसल्याने संस्थेचे पुढील चार वर्षाचे लेखा परीक्षण रखडले असल्याने संबंधित त्या काळातील लेखापरीक्षाकावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रार अर्जात केलेली आहे.जिल्हा बँकेने संस्थेचे कर्जवाटप बंद केल्यामुळे सभासद शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली असून शेतीला कर्ज मिळणे करता सभासदांची धडपड सुरू असून सभासदांना इतर कोणत्याही बँका आपल्या दारात उभे करायला तयार नाही संस्थेचे चार ते पाच वर्षाचे लेखापरीक्षण होत नाही म्हणजे ही संस्था सहकारी कायद्याच्या व नियमाच्या कक्षेत येत नाही की काय? असा सवाल जवरे यांनी केला आहे. सदर नियुक्त लेखापरीक्षकांची भूमिका संशयास्पद असून संस्थेत अपहार करणाऱ्या व्यक्तींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असून नियुक्त लेखापरीक्षकाची निर्धारित वेळ संपूनही शासन काही करायला तयार नसल्यामुळे लेखापरीक्षकाची भूमिका सभासदांच्या नुकसानीला कारणीभूत आहे. नियुक्त लेखापरीक्षक यांनी शासन आदेशाचे पालन केलेले नसून संबंधित लेखापरीक्षकाची सदर संस्थेवरची नियुक्ती रद्द करून नव्याने शासकीय लेखापरीक्षक नियुक्त करण्यात यावे या मागणीनंतर राहत्याचे सहाय्यक निबंधक यांनी तात्काळ संबंधित दोन्ही लेखापरीक्षकांना नोटीस बजावून सुनावणीस बोलवले असून सुनावणीस उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे दिलेल्या नोटिसीत म्हटलेले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!