श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे आईला जमिनीचा हिस्सा देत नाही म्हणून भाच्याने मामावर चाकूने वार करत जखमी केले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे संक्रांतीच्या दिवशी मध्यरात्री घरातील सर्व लोक झोपलेले होते. देवानंद गोपिचंद खरे व त्यांचे वडील ओट्यावर झोपलेले होते. त्याचवेळी भाचा शमूवेल हा त्याच्यासोबत ३ अनोळखी इसम घेवून आला व आरडाओरडा करू लागला. आवाज ऐकून देवानंद व वडील उठले तेव्हा भाच्याने तुम्ही माझ्या आईला जमिनीचा हिस्सा व विकलेल्या जमिनीचे पैसे का देत नाही? असे म्हणत आपल्या छातीवर मारून देवानंद खरे यांना जखमी केले तसेच त्याच्याबरोबर असलेल्या इतर अनोळखी लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर घरातील लोक देवानंद खरे यांना सोडवण्यासाठी आले तेव्हा भाच्याने तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात देवानंद गोपिचंद खरे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी शमुवेल थोरात व तीन अनोळखी इसमांविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.
