पीडित शेतकऱ्यांना शेत शिव पाणंद रस्ते खुले करून द्या;शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाची तहसीलदारांकडे मागणी

श्रीरामपूर-महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना मुख्यमंत्री बळीराजा शेत,शिव, पाणंद, रस्ता योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार मिलिंद वाघ यांना देण्यात...

श्रीरामपूर-
महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना मुख्यमंत्री बळीराजा शेत,शिव, पाणंद, रस्ता योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार मिलिंद वाघ यांना देण्यात आले.सदर योजनेत जमीन महसूल अधिनियम 143 व 5/2 नुसार रस्ता पीडित शेतकऱ्यांना शेत शिव पाणंद रस्ते शासनामार्फत खुले करून देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील शेत रस्ता पीडित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे आपले लेखी तक्रार अर्ज दाखल करून त्याची पोहोच घ्यावी, सदर योजनेत शासनामार्फत रस्ते खुले करून देण्यात येणार आहेत,असेही निवेदनात म्हटले आहे.
मुख्यमंत्री बळीराजा शेत शिव पाणंद रस्ता श्रीरामपूर तालुका समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आ. हेमंत ओगले यांनाही सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत निवेदन देण्यात येणार आहे. सदर समितीची मासिक बैठक बाबतची तारीख स्थानिक वर्तमानपत्रात व मीडियात प्रसिद्ध केल्यास जास्तीत जास्त रस्ता पीडित शेतकऱ्यांना या योजनेची माहिती होऊन त्याचा लाभ घेता येईल. शेतकरी संघटने कडून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी व या योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्याला मिळेपर्यंत अखंड पाठपुरावा करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील शेत शिव पाणंद रस्ता पीडित शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रसंगी शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाअध्यक्ष निलेश शेडगे ,उपाध्यक्ष नवनाथ दिघे ,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीताताई वानखेडे, आशा शिंदे ,तालुकाअध्यक्ष प्रकाश जाधव ,मधुकर काकड,श्रीराम त्रिवेदी ,अशोक आव्हाड,अंबादास गमे,राजेंद्र चोरमल, भास्कर गायधने,राजेंद्र म्हैस,पावलस बार्से ,अंबादास चोरमल,अशोक बनकर,आदींसह तालुक्यातील शेत रस्ता पीडित शेतकरी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!