श्रीरामपुरात रिक्षातून घेऊन जात असलेले गोमांस पकडले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 1 येथील दशमेशनगर चौक ते कोर्ट रोडने एक तीनचाकी रीअर रिक्षा गोवंशीय जनावराच्या मांसाची अवैद्य मांसविक्री करण्यासाठी...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 1 येथील दशमेशनगर चौक ते कोर्ट रोडने एक तीनचाकी रीअर रिक्षा गोवंशीय जनावराच्या मांसाची अवैद्य मांसविक्री करण्यासाठी घेवुन जात असताना पोलिसांनी रिक्षा तपासली असता त्यात 40 हजार रुपये किंमतीचे 200 किलो गोमांस, व 35 हजार रुपये किंमतीची रिक्षा असा 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरातील कर्मवीर चौक कोर्ट रोड, वॉर्ड नं 1, श्रीरामपुर या ठिकाणी 8 वाजण्याच्या एक तीनचाकी रीअर रिक्षा क्रमांक MH15 AH8706 ही जात असताना मिळून आली. सदर रीक्षा थांबवुन रिक्षांची  तपासणी केली असता त्यात 40 हजार रुपये किंमतीचे 200 किलो गोवंशीय मांस रीक्षाच्या मागील सीटावर मिळुन आले त्या रिक्षाचा चालक असिफ अप्सर शेख याने सांगितले की सदरचे गोवंश मांस फैसल आयाज क्रेशी रा.वार्ड नं 1 श्रीरामपुर याच्यामालकीचे असल्याबाबत सांगितले. पोलिसांनी त्यांचेकडून 40 हजार रुपये किंमतीचे 200 किलो गोमांस, व 35 हजार रुपये किंमतीची रिक्षा असा 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र भाऊसाहेब बिरदवडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी असिफ अप्सर शेख,  फैसल आयाज कुरेशी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे सुधारीत कायदा 2015 चे कलम 5.5 (अ), (ब), (क) .9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!