‘हिंद दी चादर’ शहीदी समागम शताब्दीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

श्रीरामपूर-“हिंद दी चादर” श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांचे सन २०२५२६ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असून, या ऐतिहासिक प्रसंगाचे...

श्रीरामपूर-
“हिंद दी चादर” श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांचे सन २०२५२६ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असून, या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन व गुरु नानक नाम सेवा संगत (सिख, सिकलकार, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल) तसेच इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी ग्राउंड (सार्वजनिक बांधकाम विभागाची मोकळी जागा, आसर्जन) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या कालावधीत सदर ठिकाणी दरबार साहिब असणार असल्याने भाविकांना कार्यक्रमस्थळी अनवाणी प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, परिसर स्वच्छ व सुस्थितीत राहावा, यासाठी दि. १३ व १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता विशेष श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा श्रमदान उपक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत नांदेड शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी, सामाजिक संस्था व स्वयंसेवकांच्या सहभागातून राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून सेवाभाव, सामाजिक एकात्मता व स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे.
नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे सर्वांगीण व काटेकोर नियोजन करण्यात यावे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असून त्यांच्या सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सेवा व मूलभूत सोयी-सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी आढावा बैठकीत दिल्या.नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या  या भव्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालय येथे आयोजित बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, राज्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांच्यासह संबंधित अधिकारी प्रत्यक्ष तर दूरदृश्यप्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संत बाबा कुलवंत सिंगजी, जथेदार तख्त सचखंड श्री हजूर साहेब और पंज प्यारे,नांदेड,संत बाबा नरिंदर सिंगजी,संत बाबा बलविंदर सिंगजी,गुरुद्वारा लंगर साहेब,संत बाबा हरणामसिंगजी, मुखी दमदमी टकसाल,रामेश्वर भाऊ नाईक (राज्यस्तरीय समितीचे समन्वयक),महेंद्रजी रामचुरा (धर्म जागरण प्रचारक) ,सिद्धेश्वरजी बिराजदार (धर्म जागरण प्रचारक)
रघबीरसिंह कथुरिया (राजू) ( राज्यसमिती सदस्य)
भगवंत सिंग बतरा (क्षेत्रीय समिती अध्यक्ष, अहिल्यानगर),रणजित सिंग आहुजा,सरबजीत सिंग सेठी
अमरिक सिंग चुग,बलविंदर सिंग बतरा,हरिंदर सिंग बतरा
हरचरण सिंग गुरुवाडा,ओम नारंग ,जास्मीत सिंग बतरा,सन्मीत सिंग चुग,रणजीत सिंग सेठी आदींनी केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!