शिवरायांचा अवमान अन ‘त्यांच्या’कडून आत्मक्लेश,याचे आश्चर्य वाटते-पालकमंत्री विखे पाटील यांनी फटकारले

श्रीरामपुर-श्रीरामपूरात काँग्रेसचे स्थानिक पुढारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याचे समर्थन करीत आहेत.महाराजांचा अवमान झाल्यानंतर ते आत्मक्लेश आंदोलन करतात, याचे मला आश्चर्य...

श्रीरामपुर-
श्रीरामपूरात काँग्रेसचे स्थानिक पुढारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याचे समर्थन करीत आहेत.महाराजांचा अवमान झाल्यानंतर ते आत्मक्लेश आंदोलन करतात, याचे मला आश्चर्य वाटते.त्यांना मनाची नाही तर जनाची तरी लाज वाटायला हवी.इतका निर्लज्जपणा मी आजवरच्या राजकारणा त कधी पहिला नाही,अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फटकारले.
विखे पाटील श्रीरामपुरात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,आपणावर जिल्ह्यात वातावरण बिघडवण्याचा होत असलेला आरोप पोरकटपणाचा असून विरोधकांना जिल्ह्यात सर्वत्र पराभव दिसत असल्याने आपल्यावर असे आरोप केले जात आहेत.
विरोधकांकडे आज कुठलेही काम राहिलेले नाही.केवळ टीकाटिप्पणी करणे हा एकमेव उद्योग त्यांचा सुरू आहे.श्रीरामपूर मध्ये भाजप-राष्ट्रवादी युतीला जनतेचे पाठबळ मिळत आहे. स्वाभाविकच त्यामुळे विरोधकांची चिडचिड सुरू आहे.त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसत आहे.त्यामुळे माझ्यावर ते टीका करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.त्यांचा अवमान झाल्यामुळे त्याची प्रतिक्रिया जनतेतुन उमटली.याउलट देशपातळीवर असलेली काँग्रेसच्या नेत्यांची बौद्धिक दिवाळखोरी जनतेसमोर आली.बिहार राज्याच्या निवडणुकांनी ते स्पष्ट केले. आज जिल्ह्यात संगमनेरमध्ये काँग्रेसचे मोठे नेते निवडणूकित पक्षाचे चिन्ह घ्यायला तयार नाहीत.ही मोठी शोकांतिका आहे.याचा अर्थ पक्ष संपुष्टात आलेला आहे.आता हा पक्ष फक्त स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपुरता राहतो की काय अशी शंका यायला लागली आहे.

श्रीरामपूर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!