टाकळीभानच्या कबड्डीपटूंना सामन्यादरम्यान मारहाण; जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या सामन्याला वादाचे गालबोट

श्रीरामपूर-जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा,कर्जत येथे आयोजित केल्या गेल्या होत्या. या स्पर्धेतील सामन्यादरम्यान मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे.या स्पर्धेचा अंतिम सामना मुलांच्या...

श्रीरामपूर-
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा,कर्जत येथे आयोजित केल्या गेल्या होत्या. या स्पर्धेतील सामन्यादरम्यान मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे.या स्पर्धेचा अंतिम सामना मुलांच्या न्यू इंग्लिश स्कूल, टाकळीभान विरुद्ध समर्थ विद्यालय,कर्जत या संघात झाला.हा सामना सुरू असतानाच अचानक प्रेक्षक मैदानात घुसले आणि त्यांनी टाकळीभानच्या खेळाडूंना मारहाण केली.यामध्ये टाकळीभान संघातील दोन खेळाडू जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
कर्जत येथे १७ वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात हा वाद झाला. स्पर्धेतील मुलांच्या गटातील अंतिम सामना कर्जतमधील समर्थ विद्यालय विरुद्ध न्यू इंग्लिश स्कूल, टाकळीभान (ता. श्रीरामपूर) या संघात उशिराने सुरू झाला.यात स्थानिक संघाला प्रेक्षकांचा जास्त पाठिंबा मिळत होता.असे असले तरी टाकळीभानच्या संघाने सामन्यात आघाडी घेतलेली होती. त्यामुळे थोडा वाद निर्माण झाला. तो वाद विकोपाला गेल्यानंतर प्रेक्षकांनी मैदानात धाव घेतली. प्रेक्षकांनी केलेल्या मारहाणीत टाकळीभान येथील दोन कबड्डीपटू जखमी झाले.सुरक्षिततेच्या कारणास्तव टाकळीभान संघाने खेळण्यास असमर्थता दाखविली.याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नसला तरी या घटनेची चर्चा सर्वदूर झाली आहे. तसेच टाकळीभान, ता. श्रीरामपूर येथे ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

प्रेक्षकांनी मैदानात घुसत कबड्डी पटूंना मारहाण केली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!