३ गावठी पिस्टलसह ४ जणांना पोलिसांनी केले जेरबंद; ७ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत;अपर पोलीस अधीक्षक कार्यालय व शहर पोलीसांची दमदार कामगिरी

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गावठी कट्टे विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या दोन जणांकडून ३ गावठी पिस्टल,६ मॅगझीन, १० जिवंत...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात गावठी कट्टे विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या दोन जणांकडून ३ गावठी पिस्टल,६ मॅगझीन, १० जिवंत काडतुसे, २ मोबाईल फोन व एर्टीगा कार असा एकुण ७ लाख ३० हजार रुपये रु. किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व श्रीरामपूर शहर पोलीसांच्या पथकाने ही  कामगिरी केली आहे.बबलु ऊर्फ इम्तीयाज आजिज शहा वय ३५ वर्ष रा. काझीबाबा रोड बाबपुरा चौक, वार्ड नं.२ श्रीरामपुर,नदिमखान साबीरखान मनियार, वय ३० वर्ष रा. नागद रोड, चाळीसगाव,जिल्हा जळगाव अशी या आरोपींची नावे असून दोघांवरही निरनिराळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.दरम्यान बेलापूर येथील ऋतुराज बाळासाहेब दाणी व नंदकिशोर संजू शिरसाठ या दोघांना हे गावठी कट्टे विकले जाणार होते.पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून दोघेही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण असून त्यांची कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.तसेच गेल्या महिनाभरात पोलिसांनी १० गावठी कट्टे पकडले असल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,दिनांक २४/०९/२०२५ रोजी सकाळी अपर पोलीस अधीक्षक
सोमनाथ वाघचौरे यांना बबलु ऊर्फ इम्तीयाज शहा रा.वार्ड नं.२ श्रीरामपुर ता. श्रीरामपुर हा एर्टीगा गाडी क्र. एम.एच.१२ एस.डी. ७३३८ यामध्ये अवैधरीत्या गावठी कट्टे विक्रीसाठी घेवुन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.त्यावरुन श्रीरामपुर शहरात संजय नगर रोड, मिल्लतनगर येथे पाटाचे कडेला पोलिसांनी सापळा लावुन सदरची गाडी पकडली.सदर गाडीमध्ये दोन जण मिळुन आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे बबलु ऊर्फ इम्तीयाज आजिज शहा, नदिमखान शाबीर खान अशी सांगितली.सदर कारची झडती घेतली असता कारच्या डॅशबोर्ड व मागील शिटचे पॉकेटमध्ये एकुण तीन अवैध गावठी पिस्टल, ६ मॅगझीन, व १० जिवंत काडतुसे मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडील २ मोबाईल फोन व इटीगा गाडी असा एकुण ७,३०,००० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या दोन्ही आरोपीविरुध्द श्रीरामपुर शहर पो.स्टे. गु.र.नं. ८७७/२०२५ आर्म अॅक्ट ३,५,७,२५ प्रमाणे पो.कॉ. १७४६ सतिष पठारे अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपुर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक
सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे,  तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देखमुख यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम हे करत आहेत.गुन्ह्याच्या आतापर्यंतच्या तपासात आरोपीविरुध्द निरनिराळ्या पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने काही संशयीतांनाही ताब्यात घेतले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!