सरसकट पंचनामे करण्याचे कृषी विभागाला आदेश-पालकमंत्री विखे पाटील यांची माहिती;प्रशासनाने ‘अलर्ट मोड’वर राहण्याच्या सूचना
श्रीरामपूर-पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहून उपाययोजना कराव्यात. स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.मदतीच्या...
श्रीरामपूर- पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहून उपाययोजना कराव्यात. स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.मदतीच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला असलेल्या स्थायी आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी. झालेल्या नुकसानीची अद्याप स्पष्ट आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र सरसकट पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. रविवारी रात्रीपासून जिल्ह्यातील सहा तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे 227 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याचेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील कापूरवाडी, केडगाव, भिंगार, चिंचोडी, चास, श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण, कोळेगाव, कर्जत तालुक्यातील मिरजगाव, जामखेड तालुक्यातील जामखेड खर्डा, नान्नज, नायगाव, साकत, शेवगाव तालुक्यातील बोधेगाव चापडगाव, मुंगी, पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी माणिकदौंडी, टाकळी, कोरडगाव, करंजी, तिसगाव, खरवंडी, अकोला अशा 24 महसूल मंडळात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील सर्व नद्या, ओढे, नाले यांना पाणी येऊन पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याशी संपर्क साधून सर्व परिस्थिती जाणून घेतली आहे. प्रशासनाने अडकलेल्या नागरीकांच्या स्थलांतरास प्राधान्य दिले आहे. पावसाची अधिकची शक्यता लक्षात घेऊन पुणे येथून एनडीआरएफ पथक बोलावून बचाव कार्य सुरू करण्यात आले असल्याचे पालकमंत्री विखे यांनी सांगितले. जामखेड-पाथर्डी सोलापूर मार्गावरील कुशल ट्रव्हल कंपनीच्या बसमधील 70 प्रवाशांची सुटका अहिल्यानगर महापालिका आणि जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने केली. पाथर्डी तालुक्यातील कारेगाव शिवारातील पुरात अडकलेल्या 3 आणि पिंपळेगव्हाणमधील एका व्यक्तीला तसेच खरमाटवाडीमधील 25 कोरडगावमधील 45, कोळसांगवीमधील 12 व्यक्तिंची सुटका करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील खैरी नदीच्या पुरात अडकलेल्या एकाच कुटंबातील 4 आणि वंजारवाडी येथे खैरी नदीच्या पाण्याचा वेढा पडल्याने 30 व्यक्तीची सुटका महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने करण्यात आली. शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील 12 आखेगाव येथील 25 लोकांची सुटका करण्यात प्रशासन आणि स्थानिक नागरीकांना यश आले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र मोहटादेवी मंदिराकडे जाणार्या भाविकांनी काळजी घ्यावी श्रीक्षेत्र मोहटादेवी मंदिराकडे जाणार्या भाविकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केले असून प्रशासनाला याभागात काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केले आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या
श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या
श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी