एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या-मा. खा.डॉ. विखे पाटील

श्रीरामपूर-महायुती सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असून एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहाणार नाही अशी काळजी घेवून पंचनामे करावेत अशी...

श्रीरामपूर-
महायुती सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असून एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहाणार नाही अशी काळजी घेवून पंचनामे करावेत अशी सूचना मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.लोणी खुर्द येथे अतिवृष्टीने नूकसान झालेल्या पिकांची पाहाणी डॉ. सुजय विखे पाटील यांनी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे म्हणाले की, “मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन, कपाशी आणि मका या महत्त्वाच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शासनाने सरसकट पंचनाम्याचे आदेश दिले असून सुमारे ५०% पंचनामे पूर्णत्वाला आले आहेत. शिल्लक पंचनामे लवकर पूर्ण होतील आणि त्यानंतर शासन सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करेल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.ते पुढे म्हणाले की, “अद्यापही पावसाची शक्यता असल्याने पूर्ण नुकसानीचे आकलन करणे अवघड आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि महायुती सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. राज्यातील कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.”
डॉ. सुजय विखे यांनी यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, पंचनामे करताना सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करावे. मोठ्या गावांमध्ये किंवा अडचणीच्या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी ड्रोनचा वापर करावा, जेणेकरून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. तसेच पंचनाम्याची वेळ निश्चित करून शेतकऱ्यांना पूर्वकल्पना द्यावी, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाईचा पूर्ण लाभ मिळेल.दरम्यान, रस्त्यांच्या समस्येबाबत विचारणा झाली असता त्यांनी सांगितले की, “लोकसंख्या वाढ आणि जमिनीच्या वाढत्या भावामुळे अनेकांनी अतिक्रमण केले असून नाले बुजवले आहेत. त्यामुळे रस्ते नकाशावर अस्तित्वात असले तरी प्रत्यक्षात वापरात नाहीत. या समस्यांचा तोडगा प्रेमाने आणि आपुलकीने काढण्याचा प्रयत्न आहे. शेवटी सगळे भाऊबंद असून बाहेरचे कोणी नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!