श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई करुन
16 हजार 700 रु. किंमतीचे नशेचे मेफेंटर्मिन नावाचे 50 इंजेक्शन पकडले आहेत.या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 27/08/2025 रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत महिती मिळाली की, डी.टी.डी.सी. कुरिअर, जिजामाता चौक, वॉर्ड नं.03, श्रीरामपूर येथे परवेज शेख या तरुणाने कुरिअरव्दारे नशेचे औषध व इंजेक्शन विक्री करण्याकरीता मागवले असुन तो दोन वाजेच्या सुमारास ते घेण्याकरीता येणार आहे.पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सदरची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांना कळवुन त्यांच्या परवानगीने तसेच औषध निरीक्षक सोमनाथ बा. मुळे यांच्याशी संर्पक करुन तात्काळ पोलीस पथकास जिजामाता चौकामध्ये सापळा लावण्यास सांगितला. सदर तरुण त्या ठिकाणी येताच खात्री झाल्यांनातर तपास पथकाने डी.टी.डी.सी. कुरिअर, जिजामाता चौक, वॉर्ड नं.03, श्रीरामपूर येथे तो ते पार्सल ताब्यात घेत असतानाच त्याला ताब्यात घेतले. त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव परवेज जमीर शेख, वय 23 वर्षे, रा. आयडीबीआय बॅक समोर, नेवासा रोड वॉर्ड नं.06, श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातुन 16700 रु. किंमतीचे मेफेंटर्मिन औषधाच्या 10 एम.एल.च्या 50 बॉटल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाआहे. या तरुणा विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, प्रशि. पोलीस उपनिरीक्षक अजित धाराव, पोकों संपत बडे, पोकॉ अमोल पडोळे, पोकॉ सचिन दुकळे, पोकॉ संभाजी खरात, पोकों अजित पटारे, पोकॉ राहुल पौळ, पोकों आजिनाथ आंधळे, मपोकों मिरा सरग तसेच औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.
