अल्पवयीन मुलीवर अत्याचार;लॉज मालकास अटक;अपर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांचा दणका

श्रीरामपूर-बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारराहुरी पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात लॉज मालकास अटक करण्यात आली आहे. लॉज मालकाने अल्पवयीन मुलीच्या वयाची कागदपत्रांची...

श्रीरामपूर-
बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार
राहुरी पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात लॉज मालकास अटक करण्यात आली आहे. लॉज मालकाने अल्पवयीन मुलीच्या वयाची कागदपत्रांची पडताळणी न करता रूम उपलब्ध करून देत सदर गुन्ह्यात मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.त्यामुळे सदर गुन्ह्यात लॉज मालकास सह आरोपी करण्यात आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीने दाखल सर्वच गुन्ह्यांची पडताळणी आता करण्यात येत आहे. सदर सर्व गुन्ह्यामध्ये लॉज-हॉटेल चालक व मालक यांचा निष्काळजीपणा किंवा अप्रत्यक्ष-प्रत्यक्ष सहभाग दिसून आल्यास त्या सर्वांवर अशीच कारवाई करण्यात येणार आहे,अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, पो स्टे राहुरी गुन्हा रजिस्टार नंबर 917/25  कलम 64(1) Bns सह 4,8,12 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा मध्ये लॉज मालक,वय 27 वर्ष  याने यातील आरोपी हा पीडित मुलीस लॉजवर घेऊन गेल्यानंतर पीडितेच्या वयाची कोणतेही कागदपत्रे न पाहता रूम उपलब्ध करून दिल्याने कलम 55 Bns सह कलम 17 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमची वाढ करून त्यास अटक करण्यात आल.न्यायालयाने देखील सदर आरोपीस पोलीस कोठडी सुनावली आहे.यातील पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याने आरोपीने गुन्ह्यास मदत केल्याचे पोलीस तपासात दिसून येत आहे.बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4 नुसार आरोपीला आजन्म करावासाची अर्थात त्याच्या नैसर्गिक उर्वरित आयुष्याच्या सश्रम  कारावासाची शिक्षा व दंड अशी शिक्षा नमूद करण्यात आली आहे.दरम्यान पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!