श्रीरामपूर-
गावातील तमाम हिंदू ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा मंदिराला विरोध आणि अनधिकृत मस्जिद प्रश्नाबाबत शिरसगाव ग्रामपंचायत मधील सत्ताधारी मंडळींनी गप बसायची भूमिका घेतली असली तरी त्यांच्या या भूमिकेला राष्ट्रीय श्रीराम संघ कडाडून विरोध करणार असल्याचा इशारा शिरसगाव शाखा अध्यक्ष रोहित यादव यांनी दिला आहे. यादव यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत गावातील जलजीवन पाणी योजना व खंडोबा मंदिराचा प्रश्न उपस्थित करत ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत मशीदी आणि दर्ग्याबाबत आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.दरवर्षी स्वातंत्र दिनाच्या दिवशी लोकहिताच्या प्रश्नाबाबत गावात ग्रामसभा भरत असते.ही सभा वादळी आणि सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणारी ठरली.
गुरुवारी दि.२१ रोजी हनुमान मंदिर सभा मंडपात झालेल्या ग्रामसभेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला.सभेच्या सुरवातीलाच ग्रामपंचायत सदस्य महेश ताके यांनी सरपंच हजर असताना सभेचे अध्यक्षपद दुसऱ्याने घेतले यावर आक्षेप घेतला. त्यामुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.त्यानंतर राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते निलेश गवारे यांनी जलजीवन योजनेचे पाणी खराब येत असलेबाबत उपास्थित केलेल्या प्रश्नावर अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने पुन्हा सभेत गोंधळ उडाला.जो पर्यंत पिण्यायोग्य पाणी येत नाही तो पर्यंत पाणीपट्टी कुणीही भरणार नाही असे गवारे यांनी ठणकावून सांगितले.राष्ट्रीय श्रीराम संघांचे शिरसगाव अध्यक्ष रोहित यादव यांनी अनधिकृत असलेल्या तीन मस्जिद व नव्याने ग्रामपंचायत शेजारी झालेल्या मस्जिद बांधकामावर प्रश्न उपस्थित केल्यावर एकच गोंधळ उडला.सर्वसामान्य जनतेला काही बांधकाम करायचे असल्यास पहिले बांधकाम परवाना घ्यावा लागतो मग मस्जिद बांधकाम करायला ग्रामपंचायतने परवानगी का दिली असा प्रश्न रोहित यादव यांनी उपस्थित केला. श्रेयवादासाठी श्री खंडोबा मंदिराला विरोध कारायचा खटाटोप जर कोणी करत असेल तर यापूढे आक्रमक भूमिकेतच आवाज उठवला जाईल असा ईशाराही रोहित यादव यांनी ग्रामसभेत दिल्याने ग्रामस्थांनी त्यास पाठींबा व्यक्त केला.
