‘त्या’ हॉटेल-लॉज मालकांना सहआरोपी करणार-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे;लैंगिक अत्याचारासाठी जागा पुरवणाऱ्यांना कायद्याचा दणका

श्रीरामपूर-बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (POCSO) आता केवळ अत्याचार करणाराच नव्हे, तर त्यासाठी जागा उपलब्ध करून देणारे हॉटेल, लॉज किंवा कॅफे...

श्रीरामपूर-
बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (POCSO) आता केवळ अत्याचार करणाराच नव्हे, तर त्यासाठी जागा उपलब्ध करून देणारे हॉटेल, लॉज किंवा कॅफे चालक-मालक हे देखील सहआरोपी असतील.१८ वर्षांखालील कोणत्याही मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यास, अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा होते. मात्र, याच कायद्यातील काही कलमांनुसार, अशा अत्याचारांसाठी मदत करणाऱ्या व्यक्तीलाही मुख्य आरोपीइतकीच शिक्षा मिळू शकते. याचाच अर्थ, जर एखाद्या हॉटेल, लॉज किंवा कॅफेच्या चालकाने किंवा मालकाने अल्पवयीन मुलांच्या लैंगिक अत्याचारासाठी आपली जागा दिली असेल. तर त्यालाही १० वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा होऊ शकते,अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.वाघचौरे पुढे म्हणाले की,
अल्पवयीन मुला-मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना आळा घालण्यासाठी श्रीरामपूर विभागात आता कठोर पावले उचलली जात आहेत.  दिलेल्या माहितीनुसार, याच पार्श्वभूमीवर, राहुरी पोलीस स्टेशनमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या एका बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात, आरोपीने दोन वेगवेगळ्या लॉजचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, त्या दोन्ही लॉजच्या चालकांना या गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आले आहे.श्रीरामपूर विभागातील १७ पोलीस स्टेशनमध्ये सध्या दाखल असलेल्या बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची पडताळणी केली जात आहे. यामध्ये, जर कोणत्याही हॉटेल किंवा लॉजच्या मालकाने निष्काळजीपणे पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आपली जागा उपलब्ध करून दिली असेल, तर त्यांनाही सह-आरोपी केले जाईल, असे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्पष्ट केले आहे.वाघचौरे यांनी सर्व हॉटेल-लॉज चालकांना सांगितले की, आपल्या हॉटेल्स आणि लॉजमध्ये येणाऱ्या व्यक्तींची नोंद रीतसर रजिस्टरमध्ये ठेवा. त्यांच्या वयाची पडताळणी करा आणि त्याचा पुरावा आपल्याकडे जपून ठेवा. केवळ थोड्या आर्थिक फायद्यासाठी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.श्रीरामपूर विभागामध्ये संगमनेर, लोणी, कोपरगाव आणि सोनईसारख्या शहरांमध्ये अनेक मोठी शैक्षणिक संकुले आहेत. येथे राज्यभरातून मोठ्या संख्येने अल्पवयीन विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी, लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या चालकांवर आणि मालकांवर कठोर गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई केली जाईल, असेही वाघचौरे यांनी सांगितले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!