आरक्षणासाठी आता आरपारची लढाई;अखंड मराठा समाजाचे मुंबई मोर्चात सामील होण्याचे आवाहन

श्रीरामपूर –शहरातील व ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवांनी सरसकट मराठा आरक्षणाच्या लढाईत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.त्याकरिता येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील...

श्रीरामपूर –
शहरातील व ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवांनी सरसकट मराठा आरक्षणाच्या लढाईत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.त्याकरिता येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन अखंड मराठा समाज श्रीरामपूर च्यावतीने करण्यात आले आहे.मुंबई मोर्चाच्या नियोजनासाठी शहरात व ग्रामीण भागात बैठक घेऊन जनजागृती केली जात असून त्याकरिता अखंड मराठा समाजाचे मराठा सेवक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. मुंबई मोर्चा संदर्भात माहिती देऊन श्रीरामपूर तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी भविष्यातही एकत्रित राहून विविध उपक्रम साजरे करण्याचे आवाहन करून सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीतून सरसकट मराठा बांधवांना आरक्षण मिळावे याकरिता ही शेवटची लढाई आहे. त्याकरिता दिनांक २७
ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून निघणाऱ्या या मोर्चात लाखो समाज बांधव सामील होणार असून दिनांक २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदान,मुंबई येथे हा मोर्चा पोहोचणार आहेत.या मोर्चात श्रीरामपूर तालुक्यातील मराठा समाजाबरोबरच इतरही समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याकरिता अखंड मराठा समाज श्रीरामपूर च्यावतीने श्रीरामपूर शहरात विविध भागात तर ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये नियोजन बैठक घेतली जात आहे.या बैठकांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या मोर्चाकरिता काही बांधव दि.२७ ऑगस्टला श्रीरामपूर वरून अहिल्यानगर येथे सहभागी होणार आहेत तर ग्रामीण भागातील काही  बांधव ट्रॅव्हल्स बस व खाजगी वाहनांनी दि.२८ ऑगस्ट रोजी शिवनेरीहून मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!