अबब…१ कोटींच्या बनावट नोटा पकडल्या;फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

श्रीरामपूर-एक कोटींच्या बनावट नोटांसह बनावट नोटा खऱ्या आहेत असे भासवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे.पोलिसांनी पकडलेल्या...

श्रीरामपूर-
एक कोटींच्या बनावट नोटांसह बनावट नोटा खऱ्या आहेत असे भासवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे.पोलिसांनी पकडलेल्या तीन जणांमध्ये एक आरोपी संगमनेर येथील आहे.तसेच या टोळीने दोन दिवसापुर्वी कोपरगाव जि.अहिल्यानगर येथे सुमारे 7 लाख रुपये किमंतीच्या बनावट नोटा दिल्या असल्याचे सांगितले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,
दि.24 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना माहिती मिळाली की,दौंड कडुन नगर शहराकडे एका पांढरे रंगाची मारुती सुझुकी इरटीगा क्र. MH-12- SU.-2317, आणि सिलव्हर रंगाची मारुती सुझुकी स्वीफ्ट गाडीमध्ये काही इसम व एका मोटारसायकल वर दोन इसम असे त्यांच्याकडे असलेल्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री करुन त्याबदल्यात ख-या नोटा घेवुन फसवणुक करणारी टोळी व्यवहार करण्याकरीता येत आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे  पथक नगर दौंड रोडवरील कायनेटीक चौकापासुन दौंड रोडने सुमारे 200 मी.अंतरावरील हनुमान मंदिराचे जवळ सापळा रचुन दौंडकडुन येणारे पांढरे रंगाचे मारुती सुझुकी इरटीगा नंबर पाहिला असता तो क्र. MH-12- SU.-2317 मध्ये असलेले इंद्रजित बिबीशन पवार वय 29 रा.शांतीनगर,भोसरी,ता.हवेली, जि.पुणे,दिपक राजेंद्र भांडारकर वय 32 रा.शांतीनगर, भोसरी ता. हवेली,जि.पुणे,शरद सुरेश शिंदे वय 29 रा. वरंवडी,ता.संगमनेर जि.अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले व त्याच वेळी मोटार सायकल वरील दोन इसम व स्विप्टगाडी मधील 3 इसम पळुन गेले.पथकाने आरोपी व चारचाकी वाहनाची झडती घेऊन 9,57,000/- रुपये किमतीचे भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसनाऱ्या 500 रु. दराच्या 12 नोटा व त्याखाली भारतीय बच्चो का बैंक 500 रुपये असे छापलेले प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा असलेले 12 बंडल, तसेच 88 भारतीय बच्चो का बैंक, 500 रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा,तसेच 20 भारतीय बच्चो का बैंक 200 रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा, एक मारुती सुझुकी इरटिका गाडी, एक टीव्हीएस स्टार कंपनीची मोटार सायकल व 04 मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.ताब्यातील आरोपीची चौकशी केली असता, त्यांनी पळुन गेलेले इसम पैकी एकाचे नाव जितेंद्र ममता साठे रा. वासुदे,ता.पारनेर जि. अहिल्यानगर असे सांगितले व इतर 04 इसमांना ओळखत नसल्याबाबत माहिती दिली. तसेच त्यांची एक टोळी असुन ते नेहमी बनावट नोटा बाळगुन त्या खरे आहेत असे लोकांना भासवुन त्यांना बनावट नोटा देवुन आर्थिक व्यवहार करुन फसवणुक करत असतात. नमुद आरोपी विरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 179 ,180,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी,सपोनि/ हरिष भोये,पोहेकॉ/सुनिल पवार, सुरेश माळी,दिपक घाटकर, हदय घोडके,पोना/भिमराज किसन खर्से,पोकॉ/आकाश काळे,अमोल कोतकर,बाळु खेडकर,मनोज साखरे,चालक सफौ/उमाकांत गावडे यांनी केलेली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!