प्रेमसंबंधातुन खुन;प्रवरा संगम येथून आरोपीच्या आवळल्या मुसक्या

श्रीरामपूर-मुंगी, ता. शेवगाव येथे गोदावरी नदीच्या काठावर प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या करण्यात आली होती.त्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

श्रीरामपूर-
मुंगी, ता. शेवगाव येथे गोदावरी नदीच्या काठावर प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या करण्यात आली होती.त्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रवरासंगम येथे सापळा रचुन मुसक्या आवळल्या.अफरोज सुलतान खान वय – 45 वर्षे रा. कटकटगेट ता. जि. छ. संभाजीनगर असे आरोपीचे नाव असून या अगोदर पोलिसांनी दुर्गेश मदन तिवारी रा. वडोद, (कान्होबा), ता. खुलताबाद, जि. छ. संभाजीनगर, श्रीमती भारती रविंद्र दुबे रा. फ्लॅट नं. 201, एस. एस. मोबाईल शॉपी जवळ, कॅनोट प्लेस सिडको, जि. छ. संभाजीनगर यांना अटक केली आहे.आरोपीने  त्याचे यापुर्वी गुन्ह्यामध्ये अटक केलेले साथीदार यांचे सोबत गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 12/08/2025 रोजी मुंगी, ता. शेवगाव गावचे शिवारात गोदावरी नदीपात्रालगत शेताच्या कडेला एका 30 वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह मिळुन आला होता. सदर घटनेबाबत शेवगांव पोलीस स्टेशनला राहुल पुंडलिंक औताडे रा. कोलठाणवाडी रोड, शिवनेरी कॉलनी, हार्सुल, छ. संभाजीनगर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी  अफरोज खान रा. खटखट गेट, ता. जि. छ. संभाजीनगर गुन्हा घडल्यापासुन फरार झालेला होता.सदर फरार आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पोउपनि/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुरेश माळी, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, रमिझराजा आतार, सारिका दरेकर, भगवान धुळे  यांचे पथक शोध घेत होते.पथकाला तो प्रवरासंगम या ठिकाणी येणार असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. पथकाने प्रवरासंगम या ठिकाणी सापळा रचुन अफरोज सुलतान खान यास  जेरबंद केले.ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे पुढील तपासकामी शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्ह्याचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या प्रकरणातील आरोपीला प्रवरा संगम येथे पोलिसांनी पकडले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!