सराईत गंठण चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या;१ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहर पोलिसांनी तीन सराईत गंठण चोरांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून सोन्याच्या मिनी गंठणसह १ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहर पोलिसांनी तीन सराईत गंठण चोरांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून सोन्याच्या मिनी गंठणसह १ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी शहरातील बजरंगनगर परिसरातील शिला अनिल पगारे (वय ४२),रा-बजरंगनगर, वार्ड.०७, श्रीरामपूर या त्यांच्या घरासमोरील झाडाचे फुले तोडायला जात असताना त्यांच्या पाठीमागून एक काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दिड तोळा वजनाचे सोन्याचे मिनी गंठण तोडुन पोबारा केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशानुसार तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदरचा गुन्हा सुदाम जाधव रा. कुकाणा, नेवासा याने त्याच्या इतर दोन साथीदारांसह केला असल्याची माहिती मिळाली. आरोपीचा शोध घेतला असता तो तपोवन रोड, अहिल्यानगर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याचा तपोवन परिसरात शोध घेऊन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने सुदाम विक्रम जाधव (वय २७) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता, त्याने सदरचा गुन्हा साथीदार फिरोज ऊर्फ लखन अजिज शेख रा.मुंकदपूर, नेवासा फाटा, नेवासा व अमर चिल्लु कांबळे रा. नेवासा फाटा, नेवासा यांच्यासह मिळून केला असल्याची कबुली दिली. त्यांना तात्काळ अटक करण्यात आली व त्यांच्याकडून ४० हजार रुपयाचे सोन्याचे मिनीगंठण, ८० हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची हिरो कंपनीची युनिकॉन मोटारसायकल असा एकूण १ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख यांच्या कडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोकों/अमोल पडोळे, पोकों/संभाजी खरात, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोकों/अजित पटारे, पोकों/सागर बनसोडे, पोकों/सचिन काकडे, पोकों/सचिन दुकळे, पोकों/रामेश्वर तारडे, मपोकों / मिरा सरग तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील सचिन धनाड, पोहेका/सतोष दरेकर, पोना / रामेश्वर वेताळ यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!