अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीने नथुराम गोडसे व्हावे लागेल असे म्हणणे चुकीचे-ससाणे;थोरात यांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा

श्रीरामपूर-काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार हेमंत ओगले...

श्रीरामपूर-
काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार हेमंत ओगले आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी करण ससाणे म्हणाले की,  की, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संत परंपरेतून उगम पावलेला आणि जन माणसाला मार्गदर्शन करणारा अध्यात्मिक प्रवाह आहे समानतेचा, भक्तीचा आणि नैतिकतेचा संदेश देणारा हा संप्रदाय जनतेच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवत आला आहे याची सर्वांना जाण आहे आणि त्याबद्दल आपण सर्वजण आदरभावही बाळगतो, मात्र संत महंतांची मोठी परंपरा असलेल्या अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीने अशा प्रकारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे म्हटले. जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, भेदाभेद भ्रम अमंगळ ही संतांची शिकवण आहे याउलट जर कोणी धर्माच्या नावाखाली समाजात द्वेष मत्सर पसरवत असेल तर तो व्यक्ती वारकरी संप्रदायाचा असू शकत नाही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बद्दल उद्घाटपणे बोलणे अप्रत्यक्षरीत्या जीवे मारण्याची धमकी देण्यासारखे बोलणे निषेधार्थ असून वारकरी संप्रदायाला गालबोट लावणारे आसल्याचे म्हटले. ज्ञानेश्वर मुरकुटे म्हणाले की, सहकार, सामाजिक, शिक्षक कृषी संस्कृती यासह सगळ्या क्षेत्रात थोरात परिवाराने केलेले कार्य बहुमोल आहे स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात व त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सिद्ध केलेले वेगळेपण समाज मनात खोलवर रुजलेले असल्याचे प्रतिपादन केले,
  बाबसाहेब दिघे यांनी बोलतांना सांगितले की, काँग्रेस नेते थोरात यांना धमकी देणाऱ्या प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करत असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सदर निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, माजी नगरसेवक रमेश कोठारी, अशोक बागुल, जनार्धन जगधने, महंता यादव, अशोक उपाध्ये, कांतीभाई पटेल, ॲड.समिन बागवान, सुहास परदेशी, शंकरराव गायकवाड,शाम अडांगळे,प्रसाद चौधरी, डॉ. राजेंद्र लोंढे, विलास पुंड, भारत भवार, रावसाहेब आल्हाट,भोला दुग्गल, अशोक जगधने, रज्जाक पठाण, रणजीत जामकर, सुनील साबळे, रियाज खान पठाण,आय्याज तांबोळी, रितेश एडके, सरबजीतसिंग चुग, सनी मंडलिक, बाबा वायदंडे, शाहरुख शेख,वैभव कुऱ्हे,अमोल आवटे, गणेश काते, विशाल साळवे, अशोक साळवे, सुभाष येवले, काकासाहेब रणवरे, दादा रणवरे, किरण खंडागळे, सुरेश बनसोडे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार हेमंत ओगले आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देण्यात आले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!