निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही-डाॅ.विखे पाटील;राहता येथे महीलांना साहीत्याचे वाटप

श्रीरामपूर-निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधीच काम करत नाही. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि मतदारसंघातील गोरगरीब जनतेचा विकास करण्यासाठी आमचे प्रयत्न...

श्रीरामपूर-
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधीच काम करत नाही. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि मतदारसंघातील गोरगरीब जनतेचा विकास करण्यासाठी आमचे प्रयत्न असतात. जातीविरहित, पक्षविरहित काम होणे हा आमचा प्राधान्यक्रम असतो.विखे पाटील परिवार ‘माणुसकी’ म्हणून शिर्डी-राहाता मतदारसंघात अनेक वर्ष काम करीत आहे.हीच माणुसकी शेवटपर्यंत टिकली पाहिजे,” असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून राहाता तालुका कृषी विभाग, पंचायत समिती उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लाभार्थी प्रमाणपत्र वाटप, फूड प्रोसेसिंग व पापड युनिट उद्‌घाटन, महिला बचत गटांना कर्जवाटप, ‘लखपती दीदी’ प्रमाणपत्र वितरण, राहाता नगरपरिषद एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत घरकुल वाटप तसेच राहाता मंडळ नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा घोलप मंगल कार्यालय, राहाता येथे पार पडला. कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, मुकुंद सदाफळ, सोपान सदाफळ, कैलास सदाफळ, संजय सदाफळ, नितीन कापसे, भाऊसाहेब जेजुरकर, राजू दमसे, दिलीप गाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ. विखे पाटील बोलत होते.

डॉ. विखे म्हणाले,ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना जनतेने दिलेलं प्रत्येक मत हे अतिशय अमूल्य आहे.पाच वर्ष आपण सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी तडफड करतो, कार्यकर्ते धावपळ करतात. 2024 ची विधानसभा निवडणूक विखे पाटील परिवारासाठी सर्वात वाईट काळ ठरली. गणेश कारखान्याच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांनाही पराभव पचवावा लागला.हा पराभव झाल्यानंतर तालुक्यातील काही ठराविक लोकांनी ठरवलं की, कोणत्याही परिस्थितीत विखे पाटील परिवाराला या तालुक्यातून हद्दपार करायचं आहे. बैठका झाल्या, अनेक रणनित्या आखल्या गेल्या. अनेक जण दिवसा सोबत दिसायचे, पण रात्री त्यांच्या बैठकीत बसायचे. कोण कोणाचं, कोण कोणा बरोबर, कोण खरं-कोण खोटं – हे काहीच कळत नव्हत पण सामान्य माणसाचे आशीर्वाद आमच्या सोबत होते.

राहाता तालुक्यातील गुन्हेगारी हद्दपार करणार
डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, पुढील पाच वर्षांत राहाता तालुक्यातील प्रत्येक कोपरा पाण्यापासून वंचित राहणार नाही आणि तालुका गुन्हेगारीमुक्त करणे हा ठाम संकल्प आहे. मुलींच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही.गरज भासल्यास कायदा हातात घेऊनही महिलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली जातील. “असा दिवस आणू की, मुलगी रात्री उशिरा घरी आली तरी पालक निर्धास्त राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!