राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जलसंपदा विभागाचा गौरव;मंत्री विखे पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार

श्रीरामपूर-केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला “बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४ ” मध्ये प्रथम क्रमाकांच्या मानाच्या पुरस्काराचे वितरण दिल्ली मध्ये राष्ट्रपती द्रौपदी...

श्रीरामपूर-
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला “बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४ ” मध्ये प्रथम क्रमाकांच्या मानाच्या पुरस्काराचे वितरण दिल्ली मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले.राज्याचे जलसंपदा तथा अहील्यानगर जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुरस्काराचा स्विकार केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २०२४ साली जलसंपदा विभागाची जबाबदारी होती.त्यांच्या कार्यकाळात विभागाने राज्याच्या जलव्यवस्थापन आणि सिंचन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याचा सन्मान प्राप्त झाला आहे.

जलसंपदा विभागाच्या यशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून होत असलेले नियोजन तसेच अतिशय पारदर्शकता,तांत्रिक सुधारणा आणि निर्धारीत वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर विशेष भर दिला आहे.धरण सुरक्षा,जलसंवर्धन सिंचन प्रकल्पांना गती आणि जलस्त्रोतांचा योग्य वापर यासर्व कामासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने सन्मानित केल्याचे डॉ विखे पाटील म्हणाले.

महायुती सरकाच्या माध्यमातून सिंचन सुधारणा कार्यक्रमात सर्व प्रकल्पांची काम निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी विभाग प्रयत्न करीत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजिदादा पवार जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व सहकारी मंत्र्याच्या  सहकार्याने राज्यातील सिंचनाचे सर्व प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी आजच्या पुरस्काराचे मोठे पाठबळ असल्याची प्रतिक्रीया मंत्री विखे यांनी व्यक्त केली.विभागातील सर्व अधिकारी अभियंते आणि कर्मचारी यांचेही मोठे योगदान पुरस्कार मिळ्ण्यात असल्याचा उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी आवर्जून केला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!