कर्मचाऱ्यांच्या प्रेमाने व निष्ठेने भारावुन गेलो-म्हस्के;श्रीरामपुर जिल्हा दुध संघ कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा

श्रीरामपूर-श्रीरामपुर जिल्हा दुध संघाच्या उभारणीत कर्मचारी व अधिकारी यांचा मोलाचा सहभाग राहीलेला आहे. कामकाज करताना कोणावरही अन्याय केला नाही. दुध धंदा...

श्रीरामपूर-
श्रीरामपुर जिल्हा दुध संघाच्या उभारणीत कर्मचारी व अधिकारी यांचा मोलाचा सहभाग राहीलेला आहे. कामकाज करताना कोणावरही अन्याय केला नाही. दुध धंदा वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा घटक मानुन अनेकांचा सुख – दुःखात सहभागी होता आहे. पंचवीस वर्षापुर्वी दुरावलेल्या कर्मचाऱ्यांची आजच्या स्नेहमेळाव्याला लक्षणीय उपस्थिती पाहुन मन भारावुन गेले आहे,असे प्रतिपादन दुध संघाचे माजी चेअरमन रावसाहेब म्हस्के यांनी दुध कामगार मेळाव्याच्या स्नेहमेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करताना केले. अध्यक्षस्थानी ई.पी.एस.९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे कार्यकारी अध्यक्ष सुभाष पोखरकर होते.
दुग्धयोगी रावसाहेब म्हस्के यांचा सहस्ञचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त अभिष्टचिंतन व कार्मचारी पेन्शन वाढीच्या चळवळीचे मार्गदर्शन होण्यासाठी श्रीरामपुर जिल्हा दुध संघाच्या २५ वर्षापुर्वी विस्थापित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन नुकतेच संघाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नुकतेच करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात कामगारांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना सत्कारमुर्ती रावसाहेब म्हस्के म्हणाले कि, १९७५ साली सुरु झालेला दुध संघ वाढीसाठी कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यासाठी कामगारांनी दिवस राञ कष्ट केलेले आहेत. कामकाज करताना दुध संघ वाढला पाहीजे, त्यासाठी दुध व्यवसाय वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. स्व. अण्णासाहेब शिंदे यांची धवलक्रांतीची प्रेरणा घेवुन संघाच्या चार तालुक्याच्या कार्यक्षेञात दुग्ध व्यवसाय वाढवला. त्यामुळेच संघाची राज्यात नव्हे तर देशात ओळख निर्माण झाली. राजकारण करताना अनेक प्रलोभन आली माञ नेतृत्वाशी आजपर्यंत गद्दारी केली नाही. नेतृत्वाशी एकनिष्ठ राहील्याने अनेक पदं मिळाली त्याचा वापर जनहीतासाठीच केला. कधीही कुणावर आन्याय केला नाही त्यामुळे प्रेम करणारा मोठा वर्ग आजही सोबतीला आहे. गेली २५ वर्षे कामगार दुरावला आसला तरी आजच्या माझ्या सत्कारासाठी कामगारांची उपस्थिती लक्षणीय आसुन कामगारांच्या या प्रेमाने भारावुन गेलो आहे. यावेळी म्हस्के यांना काही क्षण अश्रु अनावर झाल्याने काहीवेळ सभागृहात निशब्द शांतता पसरली होती.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष पोखरकर यांनी कामगारांनी मिळणारी तुटपुंजी पेन्शन वाढुन मिळावी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरु आसुन किमान ७ हजार ५०० व महागाई भत्ता मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा हसुरु असुन लवकरच या मागणीचा सरकारला विचार करावा लागेल असे सांगितले. यावेळी रीपाईचे बाळासाहेब गायकवाड,  गोविंद जगताप, शाम राठोड, शिवाजी भोसले, संजय ईनामके, दत्तु हुल्लाळे, आन्वरभाई शेख यांनी मनोगत व्यक्त करताना श्रीरामपुर जिल्हा दुध संघ पुन्हा नव्या दमाने संकलन सुरु करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी आपेक्षा व्यक्त केल्याने उपस्थित कामगारांनी त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेक वर्षे एकदिलाने काम केलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांची तब्बल २५ वर्षानंतर गाठीभेटी झाल्याने एकमेकांची खालीखुशाली जाणुन घेण्यात मग्न झाले होते. अखेर स्नेहभोजनाने या स्नेहमेळाव्याची सांगता झाली. यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचलन दत्ताञय निर्मळ यांनी केले तर शेवटी आभार शाम दळे यांनी मानले. ह.भ.प. म्हस्के महाराज यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!