‘त्यांना’ विधानसभेला जनतेनेच योग्य उत्तर दिले-ना.विखे पाटील यांचा थोरातांना खोचक टोला

श्रीरामपूर-निळवंडे धरणासंदर्भात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टिकेला मी उत्तर देण्याची काहीच आवश्यकता नाही.जनतेनेच त्यांना विधानसभेला त्याबाबतचे उत्तर दिले आहे.खर...

श्रीरामपूर-
निळवंडे धरणासंदर्भात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टिकेला मी उत्तर देण्याची काहीच आवश्यकता नाही.जनतेनेच त्यांना विधानसभेला त्याबाबतचे उत्तर दिले आहे.खर तर त्यांनीच आता आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचा खोचक टोला राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.लोणी येथे माध्यमांशी संवाद साधताना ना. विखे पाटील पुढे म्हणाले की,बोगस आणि खोटे मतदार संबोधून त्यांच्याच तालुक्यातील मतदारांचा अपमान ते करीत आहेत.पराभव झाल्यामुळे आता चाळीस वर्षानंतर तुम्हाला मतदार बोगस वाटायला लागले का? आयोगाकडून मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती घेण्यासाठी मुदत दिली जाते. मात्र आज आयोगावर आरोप करणारे तेव्हा झोपले होते का? कोणत्याही निवडणुकीचा निकाल खुल्या मनाने स्वीकारला पाहिजे.’जाणता राजा’ यांना जाणीव करून देण्यासाठी मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. कारण ते एकीकडे सरकारच्या मदतीची अपेक्षा करतात पण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अहवालात केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करण्याचे मोठे मनही दाखवत नाहीत. याबाबतची वस्तूस्थिती मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने व्हीएसआयच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला सांगितली होती. तोच संदर्भ माझ्या भाषणात होता.राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देण्याचे मोठे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून झाले आहे.

अजितदादांबद्दल अवमानकारक बोलण्याचा प्रश्नच नाही

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा माध्यमांकडून विपर्यास केला गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल माझे वक्तव्य नव्हते. त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याचा प्रश्नच नाही. तसे माझ्याकडून कधीही झालेले नाही.अनेक वर्ष देशात कृषीमंत्री पदावर राहूनही ज्यांना सहकारी कारखानदारी बाबत कोणतेही निर्णय करता आले नाहीत, अशा जाणत्या राजांना जाणीव करून देण्यासाठी मी बोललो.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!