वायरमन अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात;सौर कृषी पंपासाठी घेतले 2500 रुपये

श्रीरामपूर-सौर कृषी पंप मंजूर करायचा असल्यास 4000 रुपये व राहत्या घराच्या वीज मीटरला सिंगल फेजचे कनेक्शन जोडण्यासाठी 500 रुपये लाच वायरमनने...

श्रीरामपूर-
सौर कृषी पंप मंजूर करायचा असल्यास 4000 रुपये व राहत्या घराच्या वीज मीटरला सिंगल फेजचे कनेक्शन जोडण्यासाठी 500 रुपये लाच वायरमनने तक्रारदार यांच्याकडे मगितली.लाचेच्या रकमेतील 2500 रुपये  तक्रादार यांच्याकडून स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वायरमनला रंगेहाथ पकडले.राजेंद्र दादासाहेब कराळे, वय 41 वर्ष, धंदा- नोकरी, बाह्यस्त्रोत वायरमन, नेमणूक म.रा.वि.वि.कंपनी, करंजी कक्ष, ता.पाथर्डी असे आरोपी वायरमनचे नाव आहे.आरोपी कराळे यास ताब्यात घेण्यात आले असून पाथर्डी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आईच्या नावे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंप मंजूर झाला. त्यानंतर तक्रारदार यांच्या गावाकरिता नेमून दिलेले वायरमन राजेंद्र दादासाहेब कराळे हे सौर कृषी पंप बसविण्याच्या ठिकाणी तक्रारदार यांचे शेतामध्ये आले व त्यांनी आल्यानंतर जागेची पाहणी केल्यानंतर त्यांच्याकडील मोबाईल मध्ये फोटो काढले व तक्रारदार यांना म्हणाले की, सौर कृषी पंपा चे ठिकाणी लाईटचा पोल आहे त्याकरिता तुमचा सौर कृषी पंप चा अर्ज नामंजूर होऊ शकतो. त्यामुळे सौर कृषी पंप मंजूर करायचा असल्यास 4000 रुपये द्या.वायरमन हा सौर कृषी पंपाचा अर्ज नामंजूर करण्याची धमकी देत असल्याने तक्रारदार यांनी नाईलाजास्तव त्यांना 2 हजार रुपये दिले होते.

त्यानंतर वायरमन याने तक्रारदार यांना उरलेले 2000 रुपये सौर कृषी पंप बसवल्यानंतर द्या असे सांगितले व सर्वे पूर्ण करून शेतातून निघून गेले. त्यानंतर तक्रारदार यांचे शेतामध्ये सौर कृषी पंप बसविण्याचे काम पूर्ण झाले. कराळे वायरमन हे तक्रारदार यांचे शेतात कृषी सौर पंप बसविण्याच्या ठिकाणी सर्वे पूर्ण केल्याच्या मोबदल्यात 2000 रुपये तसेच तक्रारदार यांचे राहते घराचे वीज मीटरला सिंगल फेजचे कनेक्शन जोडण्यासाठी 500 रुपये असे एकूण 2500 रुपये लाच मागणी करत असले बाबतची तक्रार लाच लुचपत प्रतीबंधक विभाग येथे प्राप्त झाली होती. सदर तक्रारीप्रमाणे दि.17/08/2025 रोजी सापळा लावून आरोपी राजेंद्र कराळे यास तक्रारदार यांच्या कडून स्वतः 2500 रुपये लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहाथ पकडण्यात आले.सदर कारवाई पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्यासह पोलीस नाईक उमेश मोरे, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल शेखर वाघ, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल हारूण शेख यांनी केली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!