‘उडता श्रीरामपूर’…! हजारो रुपये किंमतीच्या ५० नशेच्या इंजेक्शनसह तरुणी गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूरात उत्तेजक नशेच्या मेफेन्टरिन इंजेक्शनची विक्री करणाऱ्या एका तरुणीसह तिच्या एका साथीदाराला श्रीरामपुर शहर पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे.याबाबत या...

श्रीरामपूर-
श्रीरामपूरात उत्तेजक नशेच्या मेफेन्टरिन इंजेक्शनची विक्री करणाऱ्या एका तरुणीसह तिच्या एका साथीदाराला श्रीरामपुर शहर पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे.याबाबत या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या इंजेक्शनची खरेदी-विक्री करण्याचा कोणताही परवाना त्यांच्याकडे नसल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.जिम मध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना ही औषधे विक्री केली जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.गेल्या काही दिवसांपासून वाढत्या पोलीस कारवायांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर परिसर नशेबाजीच्या विळख्यात अडकत चालल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिल्पा शेळके ही तरुणी नोंदर्न ब्रांच, श्रीरामपूर येथे नशेच्या बॉटलची विक्री करण्यासाठी निळ्या रंगाचे जुपीटर कंपनीच्या स्कुटीवर येणार आहे.तसेच सदर नशेच्या बॉटल हया तिचे स्कुटीचे डिकीत आहेत अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख,उपनिरीक्षक दीपक मेढे,पो कॉ आंबादास आंधळे, मिरा सरग आदींनी सापळा लावून तिला ताब्यात घेतले.तिला ताब्यात घेऊन झडती घेतली असता गाडीच्या डिकीत सुमारे १६ हजार ७४० रुपये किंमतीचे इंजेक्शन आढळून आले.तिच्याकडे कोणताही औषध खरेदी विक्रीचा परवाना नाही. औषधाची खरेदी बिलही नव्हते. तसेच सदरचे औषधे जिममध्ये पुरवले जायचे.यामध्ये गणेश मुंडे रा.स्वप्ननगरी, गोंधवणी, श्रीरामपूर याचे साथीने विक्री करत असल्याचे सांगितले.गुंगीकारक व अपायकारक औषधे अवैधरित्या विना परवाना विना खरेदी बिलाने घेवुन विना विक्री बिलाने छापील किंमती पेक्षा जास्त किंमतीस विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शिल्पा बापू शेळके,गणेश मुंडे, दोघे रा. गोंधवणी, श्रीरामपूर, यांचे विरुध्द  सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
सदरची जप्त करण्यात आलेल्या औषधे ही प्रवर्ग एच प्रकारात मोडत असुन ती फक्त परवाना धारकाने डॉक्टरांच्या चिठ्ठीवर विक्री करणे बंधनकारक आहे. सदर औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय औषधाचा मुळ गुणधर्म माहित नसताना जिममध्ये व्यायाम करणारे तरुणांना व इतर ग्राहकांना विक्री केली जाते. अशा औषधाच्या वापरामुळे ग्राहकांच्या आरोग्यास व जिवीतास हानी होण्याची शक्यता आहे. सदर औषधाचा उपयोग हा कमी रक्तदाबामध्ये केला जातो तसेच त्याचा गैरवापर हा शारीरक क्षमता वाढविण्यासाठी होतो.  सदर औषध हे डॉक्टराच्या सल्याशिवाय तसेच निगरानी शिवाय घेतल्यास ग्राहकाच्या आरोग्यास धोका निर्माण होवुन जिवीतास हाणी होवु शकते अशी माहीती अन् व औषध अधिकारी श्री.मुळे यांनी दिली आहे.

बऱ्याच दिवसांपासून या गुन्ह्याच्या पध्दतीवर आम्ही गुप्तपणे लक्ष ठेऊन होतो.अखेर आज सापळा रचून कारवाई करत महिलेसह तिच्या साथीदाराला अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे.महिलेच्या घराचीही झडती घेण्यात आली आहे.

-नितीन देशमुख,पोलीस निरीक्षक

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!