राहता हादरले;पती पत्नीच्या वादात संपूर्ण कुटुंबाचा बळी;विहरीत चिमुकल्यांसह पाच जणांचे मृतदेह

श्रीरामपूर-राहता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारातील एका विहरीत पाच जणांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.कौटुंबिक वादातून बापाने आपल्या चार चिमुकल्यांसह विहिरीत उडी...

श्रीरामपूर-
राहता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारातील एका विहरीत पाच जणांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.कौटुंबिक वादातून बापाने आपल्या चार चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना  घडली आहे.पती पत्नीत सुरू असलेल्या वादात चिमुकल्यांचा बळी जाऊन सम्पूर्ण कुटुंबच संपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
एका विहिरीत पाच जणांचे मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण काळे (वय ३०) याने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून देत स्वतः ही जीवन संपवलं.अरुण काळे हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथे राहत होता. त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती. गेल्या काही दिवसांपासून घरात सुरू असलेल्या वादामुळे त्याची पत्नी आठ दिवसांपूर्वी त्याला सोडून माहेरी येवला तालुक्यात निघून गेली होती. तो तिला परत बोलावण्यासाठी सारखे फोन करत होता परंतु ती प्रतिसाद देत नसल्याने अरुणने आपल्या चिमुकल्यांसह आपली जीवनयात्रा संपवली.अरुण काळे याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली होती. शिवानी अरुण काळे (वय ८), प्रेम अरुण काळे (वय ७), वीर अरुण काळे (वय ६) आणि कबीर अरुण काळे (वय ५) अशी मृत मुलांची नावे आहेत. अरुणने या चौघांना विहिरीत ढकलून दिले आणि त्यानंतर स्वतःचे हातपाय दोरीने बांधून विहिरीत उडी घेतली.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ शोधकार्य सुरू केले. त्यानंतर विहिरीतून पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस स्टेशन येथे पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.पती-पत्नीमधील वादामुळे अख्खं कुटुंब संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!