प्राईडमधून मोठे अधिकारी घडतील-दिपाली ससाणे;   ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा

श्रीरामपूर-मी १० वर्षापूर्वी पाहिलेला प्राईडचा हा वटवृक्ष बहरला आहे. या वृक्षाला शाखा आल्या आहेत. दिवसेंदिवस हा वटवृक्ष असाच बहरत राहावा यातून...

श्रीरामपूर-
मी १० वर्षापूर्वी पाहिलेला प्राईडचा हा वटवृक्ष बहरला आहे. या वृक्षाला शाखा आल्या आहेत. दिवसेंदिवस हा वटवृक्ष असाच बहरत राहावा यातून आयपीएस, इंजिनिअर, मोठे अधिकारी घडतील याची मला खात्री आहे, असे प्रतिपादन दिपाली ससाणे यांनी केले.
पंचायत समितीच्या मा. सभापती व प्राईडच्या संस्थापिका  डॉ. वंदना मुरकुटे व माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भेर्डापूर-वांगी येथे सुरु असलेल्या प्राईड अॅकेडमी इंग्लिश मेडीअम स्कूल अॅन्ड ज्युनि. मध्ये आज प्राईड अॅकेडमीमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.भारतीय युवक कॉग्रेसच्या सचिव तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा दिपाली ससाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष लकी शेठी, अशोकनगर येथील  डॉ. सारिका कुंदे, भेर्डापूर च्या  डॉ. माया कवडे, सौ.त्रिवेणी गोसावी आदी मान्यवर, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करत देशभक्तीपर गाण्यावर मुलांनी कवायत प्रकार सादर केले. विद्यार्थ्यांनी पथ संचलन करून ध्वजाला सलामी दिली. लहान मुलांनी देशभक्तीपर भाषणे केली.  यावेळी डॉ. कुंदे म्हणाल्या की ग्रामीण भागात डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्यामुळे  दिले जाणारे आदर्शवादी व दर्जेदार शिक्षणाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ही वाखाणण्याजोगी आहे. तसेच लकी सेठी यांनी शाळेच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. शाळा स्तरावर झालेल्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते बॅजेस वितरण करून त्यांचा शपथग्रहण विधी पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थीनी अदिती हापसे व तेजल निर्मळ यांनी केले. शाळेचे क्रीडा शिक्षक प्रदीप गोराणे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्या प्रीती गोटे  व सर्व शिक्षक तसेच कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!