भागवत प्रतिष्ठानच्या नेत्रसेवा उपक्रमाचा १०१ शिबिरांचा टप्पा पार;२८०० रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया

श्रीरामपूर-२०१६ पासून सुरू झालेल्या भागवत प्रतिष्ठानच्या नेत्रसेवा उपक्रमाने १०१ शिबिरांचा टप्पा पार केला. चार हजार रुग्णांची तपासणी, २८०० मोतिबिंदू शस्त्रक्रिया आणि...

श्रीरामपूर-
२०१६ पासून सुरू झालेल्या भागवत प्रतिष्ठानच्या नेत्रसेवा उपक्रमाने १०१ शिबिरांचा टप्पा पार केला. चार हजार रुग्णांची तपासणी, २८०० मोतिबिंदू शस्त्रक्रिया आणि हजारो नागरिकांना परत मिळालेली दृष्टी या सेवायात्रेतून ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने उजेडाची कोंदणं फुलत आहेत.भागवत प्रतिष्ठान, स्वस्तिक ग्रुप, पुण्याच्या बुधराणी हॉस्पिटल आणि बेलापूरच्या डॉ. काळे हॉस्पिटल यांच्यातर्फे १०१ वे मोफत मोतिबिंदू व नेत्रतपासणी शिबिर धनश्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.भागवत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक खंडागळे प्रास्ताविकात म्हणाले, २०१६ पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत आजवर चार हजार रुग्णांची तपासणी, तर २८०० मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. बेलापूर-ऐनतपूरसाठी १३६ कोटींची पाणीपुरवठा योजना, साठवण तलावासाठी साडेआठ एकर, ११०० घरकुलांसह नागरी सुविधांसाठी ३४ एकर जागा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोफत दिल्याचेही त्यांनी नमूद केले. नवले म्हणाले, गावकरी मंडळाच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे व शालिनी विखे यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव विकासकामे झाली आहेत. काहींच्या षड्यंत्रामुळे अडथळे येत असले, तरी विकासाची गती अबाधित ठेवली जाईल.यावेळी बुधराणी हॉस्पिटलच्या मीरा पटारे, मनीषा कोरडे, डॉ. सुधीर काळे व डॉ. संपदा काळे यांचा धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वस्तिक ग्रुप, सत्यमेव जयते ग्रुपचे सदस्य, गावकरी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, रुग्ण व नागरिक उपस्थित होते. देविदास देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर खंडागळे यांनी आभार मानले.

मोफत मोतिबिंदू व नेत्रतपासणी शिबिर धनश्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!