जर्सी गोऱ्हे अन भाकड जनावरे धडकणार श्रीरामपूर प्रांत कार्यालयात;कर्जमुक्तीसह व गोवंश कायद्यात सुधारणेची मागणी

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी श्रीरामपूर प्रांत कार्यालय येथे आंदोलन करून जर्सी गोऱ्हे व भाकड संकरित गाई प्रांताधिकारी...

श्रीरामपूर-
अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी श्रीरामपूर प्रांत कार्यालय येथे आंदोलन करून जर्सी गोऱ्हे व भाकड संकरित गाई प्रांताधिकारी यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांचा हा आक्रोश मोर्चा धडकणार आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेला हा लढा असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभाग नोंदवून सरकारला जाग आणण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी केले आहे.शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने श्रीरामपूर उपविभागाचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले की,आज रोजी शेतकऱ्यांपुढे भाकड जनावरांचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यासाठी गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून विदेशी गोवंश तसेच जर्सी व व्होस्टीन भाकड गाई सदर कायद्यातून वगळण्यात याव्यात तसेच वन्य प्राणी जीव संरक्षण कायदा रद्द करण्यात यावा, त्याचबरोबर राज्यात होत असलेल्या भेसळयुक्त दुधाचा प्रतिबंध करावा, शेती साहित्याच्या सर्रास होत असलेल्या भुरट्या चोऱ्या थांबवाव्यात तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी,अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष युवराज जगताप, डॉ. दादासाहेब आदिक, साहेबराव चोरमल, सागर गिऱ्हे,संतोष पटारे, संजय वमने, शिवाजीराव पटारे, सतीश नाईक, संदीप उघडे, सिकंदर भाई शेख, शरद असणे, प्रमोद ताके, सुजित बोडखे, इंद्रभान चोरमळ, संजय काळे, अशोक काळे, बाबासाहेब पवार, ज्ञानदेव चक्रनारायण, अनिल रोकडे आदि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 

शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने श्रीरामपूर उपविभागाचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन दिले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!