२५–२५ वर्षे मंत्री राहूनही ‘त्यांना’ पाणी देता आलं नाही-मा. खा.डॉ. विखे;गोरक्षवाडी येथे निळवंडे डाव्या कालव्याचे जलपूजन

श्रीरामपूर-२५–२५ वर्षे राज्यात मंत्री राहूनही पाणी देता आलं नाही.आजही संगमनेर मतदारसंघात २०० पाण्याचे टँकर धावतात.अखेर संगमनेर मतदारसंघातील लोकांनीच मनावर घेतले आणि...

श्रीरामपूर-
२५–२५ वर्षे राज्यात मंत्री राहूनही पाणी देता आलं नाही.आजही संगमनेर मतदारसंघात २०० पाण्याचे टँकर धावतात.अखेर संगमनेर मतदारसंघातील लोकांनीच मनावर घेतले आणि बदल घडवला.सर्वसामान्य घरातील आमदार अमोल खताळ यांना जनतेने निवडून दिले,अशी जहरी टीका माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता मा.खा.डॉ.सुजय विखे यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी येथे पार पडलेल्या जलपूजन सोहळ्यात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते.निळवंडे डावा कालवा प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा प्रवास सांगत ते म्हणाले की, पन्नास वर्ष सर्व सत्तास्थाने ताब्यात असताना सुध्दा  तुम्हाला जे करता आल नाही, ते पोरा बाळांनीच करून दाखवत पाणी आणले.डॉ. विखे पाटील म्हणाले,“निळवंडे डावा कालवा योजना ३०–४० वर्षांपासून फक्त कागदावर होती. या दरम्यान अनेकदा बैठका झाल्या, आश्वासने दिली गेली, पण गोरक्षवाडी, संगमनेर आणि आसपासच्या गावांपर्यंत पाण्याचा थेंब पोहोचत नव्हता. जनतेच्या अपेक्षा वारंवार वाढवल्या, पण त्यांची पूर्तता झाली नाही. आज या प्रकल्पामुळे केवळ शेतीसाठीच नाही, तर पिण्यासाठीही भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे. हा टप्पा शेतकऱ्यांच्या जीवनमानात क्रांती घडविणारा असल्याचे डॉ विखे म्हणाले.घोषणांनी पोट भरत नाही, प्रत्यक्ष काम केल्याशिवाय जनता खुश होत नाही.प्रत्यक्ष कामाला तालुक्यात सुरूवात झाली आहे.भोजापुरचं पाणी नानज दुमाला, तीगाव, सोनोशी पर्यंत पाणी पोहोचवलं. गेली ३० वर्षे हा चमत्कार कुणीच घडवू शकला नव्हता. पण शिस्त, नियोजन आणि कटाक्ष ठेवल्यास अशा योजना पूर्णत्वाला जाऊ शकतात. पाणी आणणं हे केवळ राजकारण नसून जनतेच्या जगण्याशी संबंधित कामाची आणि कर्तव्याची  जबाबदारी असल्याचे डॉ विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.या प्रकल्पामागे केंद्र सरकारचा मोठा वाटा असल्याचे सांगून  पाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, केंद्र सरकारच्या निधीतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मिळालं. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पाणी सोडण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न  झाला.पुढील दोन वर्षांत निमगावजाळीचा प्रत्येक कानाकोपरा पाण्याखाली आणू,” असा जनतेसमोर शब्द दिला.जलपूजनानंतर गोरक्षवाडीत जलयात्रा काढण्यात आली. डोल-ताशांच्या गजरात शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी विखे पाटील यांचा सत्कार करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.

संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी येथे पार पडलेल्या जलपूजन सोहळ्यात बोलताना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!