बेलापूर खुर्दच्या सरपंचपदी सविता राजुळे

श्रीरामपूर-तालुक्यातील बेलापूर खूर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता राजुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.बेलापूर खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रणाली भगत यांनी सरपंच पदाचा राजीनामा...

श्रीरामपूर-
तालुक्यातील बेलापूर खूर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता राजुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बेलापूर खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रणाली भगत यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीत सविता राजुळे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे सरपंचपदी सौ.राजुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल गाडे, वसंत पुजारी, दिलीप भगत, राजेंद्र बारहाते, माजी सरपंच प्रणाली भगत, कल्पना भगत, राणी पुजारी, नयना बडधे, प्रियंका थोरात आदी सदस्य हजर होते.
निवडणूक अधिकारी म्हणून नितीन मुळे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी राजेंद्र मेहत्रे आणि कामगार तलाठी श्रीमती.शिंदे  यांनी सहकार्य केले. याप्रसंगी तनपुरे कारखान्याचे माजी संचालक द्वारकनाथ बडदे, ज्ञानदेव वाकडे, विनय भगत, प्रतिक राजुळे, राजेंद्र कुंकूलोळ, सुनील क्षिरसागर, शशिकांत पुजारी, रामदास थोरात, राकेश बडदे, बी.एम. पुजारी, गोरख भगत, पंकज खर्डे, जितेश महाडिक, विक्रांत पाटील, पंकज पाटील, पोलीस पाटील उमेश बारहाते, युवराज जोशी, ऋषिकेश बारहाते, चंद्रकांत गाढे, ऋषिकेश महाडिक, रणजीत काळे, सतीश बारहाते, अशोक महाडिक, राजेंद्र गागरे, शंकर बारहाते, अनिल बारहाते, प्रशांत बडदे, नंदू कुर्‍हे, समीर सय्यद, अर्जुन गोरे, कैलास थोरात, गणेश महाडिक, अमोल जोशी, किशोर कांबळे, राहुल शेलार, सुनील बडधे, संतोष बडधे, महेश बडधे, सागर तागड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.यानिवडीबद्दल सौ.राजुळे यांचे  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील,मा. आ. भानुदास मुरकुटे व शरद नवले यांनी अभिनंदन केले आहे.

बेलापूर खूर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता राजुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!