टाकळीभान टेलटॅंकच्या पाण्याचे आ.ओगले यांच्या हस्ते जलपूजन;टेलटॅंक परिसरात पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार-आ.ओगले

श्रीरामपुर-टाकळीभान टेलटॅंक परिसरात पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार असून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले...

श्रीरामपुर-
टाकळीभान टेलटॅंक परिसरात पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार असून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याचे  प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले आहे . श्रीरामपूर तालुक्याच्या टाकळीभान व परिसरातील गावांना वरदान ठरलेल्या टाकळीभान टेलटॅंकचे शासकीय जलपूजन आ. ओगले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की,  कमी पर्जन्य हा चिंतेचा विषय असून धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे  टाकळीभान टेलटॅंक पूर्ण क्षमतेने भरला आहे त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा देखील प्रश्न मार्गी लागणार  असल्याचे म्हटले.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे म्हणाले की,  पाटचाऱ्या दुरुस्त करणे आवश्यक असून  आमदार हेमंत ओगले यांनी पाट चाऱ्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली असल्याचे सांगीतले. सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, डॉ वंदनाताई मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, मांजाबापू थोरात, विलास दाभाडे, भारत भवार, जलसंपदा विभागाचे संजय कल्हापुरे, बाबासाहेब तनपुरे, ऍड प्रमोद वलटे, एकनाथ पटारे, तुकाराम बोडके, सोमनाथ पाबळे, काकासाहेब रणनवरे, गाधे काका, अनिल माने, शाखा अभियंता मारवाडी, शेख, कालवा निरीक्षक तनपुरे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाकळीभान टेलटॅंकचे शासकीय जलपूजन आ. ओगले यांच्या हस्ते करण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!